अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:28 AM2021-05-12T04:28:51+5:302021-05-12T04:28:51+5:30

प्रकल्पांतर्गत येत असलेल्या चिमूर, वरोरा, भद्रावती, नागभीड व ब्रम्हपुरी या पाच तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना खावटी अनुदान योजनेची अंमलबजावणी ...

Khawati grants to Scheduled Tribe families | अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अनुदान

अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अनुदान

googlenewsNext

प्रकल्पांतर्गत येत असलेल्या चिमूर, वरोरा, भद्रावती, नागभीड व ब्रम्हपुरी या पाच तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना खावटी अनुदान योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

खावटी अनुदान योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत अर्ज केलेले नाही. त्यांनी प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या जवळच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आदिवासी मुलांचे, मुलींचे वसतिगृह येथे प्रत्यक्ष जाऊन विनामूल्य अर्ज प्राप्त करुन घ्यावे तसेच कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर योजना १०० टक्के अनुदानावर असल्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही स्तरावर कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूरचे प्रकल्प अधिकारी के. ई. बावनकर यांनी केले आहे.

बाॅक्स

...या कुटुंबाना मिळणार लाभ

सदर कुटुंबामध्ये प्रामुख्याने पारधी जमात, आदिम जमात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील मनरेगावर काम करणारी कुटुंबे, परित्यक्ता, घटस्पोटीत महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब इत्यादी कुटुंबांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

Web Title: Khawati grants to Scheduled Tribe families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.