माझ्या कोरोनाग्रस्त वडिलाला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:28 AM2021-04-16T04:28:47+5:302021-04-16T04:28:47+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जाताना दिसत आहे. अनेकांना बेड मिळत नसल्याने हाल होत आहे. यापूर्वी एका ...

Kill my coronated father with a poisonous injection | माझ्या कोरोनाग्रस्त वडिलाला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाका

माझ्या कोरोनाग्रस्त वडिलाला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाका

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जाताना दिसत आहे. अनेकांना बेड मिळत नसल्याने हाल होत आहे. यापूर्वी एका वयोवृद्ध रुग्णाला बेड नसल्याने उघड्यावर झोपण्याची वेळ आली होती. तर आता एका मुलाला आपल्या कोरोनाग्रस्त वडिलांना बेड मिळण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

तब्बल दोन दिवस बेड न मिळाल्याने आपल्या वडिलांना रुग्णवाहिकेतच ठेवण्याची वेळ त्याच्यावर ओढवली. यासाठी तो तेलंगणापर्यंत जाऊन आला. मात्र तेथेही त्याच्या पदरी निराशाच पडली. जर बेड उपलब्ध होत नसेल तर प्रशासनाने आम्हाला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकावे, अशी संतप्त भावना त्याने या व्हिडिओत व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वरोरा येथे एक रुग्ण १३ एप्रिलला पॉझिटिव्ह आढळून आला. प्रकृती बिघडल्याने त्यांना चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. त्यांचा मुलगा रुग्णवाहिकेने वडिलांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन आला. मात्र, येथे बेड उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना भरती करण्यास नकार देण्यात आला.

बॉक्स

वडील ऑक्सिजन पाईप लावून रुग्णवाहिकेतच पडून

मुलगा सर्व खासगी कोविड रुग्णालयांत वणवण फिरला. मात्र येथेही त्याच्या पदरी निराशाच पडली. अखेर रात्री एक वाजता तो आपल्या वडिलांना घेऊन शेजारच्या तेलंगणा राज्यात गेला. मात्र तिथेही हीच स्थिती होती. त्यामुळे आपल्या वडिलांना रुग्णवाहिका घेऊन तो चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात परत आला. मात्र, तरीही रुग्णालयात भरती करण्यास जागा मिळाली नाही. वडील ऑक्सिजन पाईप लावून वाहनात पडून होते. यावेळी या मुलाने व्हिडिओ काढून प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला.

Web Title: Kill my coronated father with a poisonous injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.