वाघाला ठार मारा, लोकप्रतिनिधी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 05:00 AM2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:29+5:30

वनविभागासमोर नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे. मध्य चांदा वन विभागांतर्गत राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा धुमाकूळ आहे. यात दहा निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. वनाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाघ मोकाट असून शेतकऱ्यांचे बळी जात आहेत. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा किंवा ठार मारा, अशी मागणी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली असून आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे.

Kill the tiger, the people's representatives gathered | वाघाला ठार मारा, लोकप्रतिनिधी एकवटले

वाघाला ठार मारा, लोकप्रतिनिधी एकवटले

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र । तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रातील नरभक्षी वाघाने निरपराध दहा शेतकऱ्यांचा बळी घेतल्यानंतर वाघाला ठार करा आणि दोन्ही वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तत्काळ निलंबित करा व वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांना वनविभागात नोकरी देण्याची मागणी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून वनविभागाने वेळीच वाघाचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेला आहे.
वनविभागासमोर नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे. मध्य चांदा वन विभागांतर्गत राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा धुमाकूळ आहे. यात दहा निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. वनाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाघ मोकाट असून शेतकऱ्यांचे बळी जात आहेत. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा किंवा ठार मारा, अशी मागणी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली असून आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे.

बाळू धानोरकरांची वनमंत्र्याशी चर्चा
चंद्रपूर : राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने गेल्या २२ महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. यासंदर्भात शनिवारी खासदार बाळू धानोरकर यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. दीडशेच्या आसपास कॅमेरे असून वनकर्मचाऱ्यांचे पथकही दिवसरात्र नरभक्षी वाघाचा शोध घेत आहेत. वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले नाही. शनिवारी खासदार धानोरकर यांनी मुख्य वनसंरक्षक प्रवीण कुमार यांच्याशी बैठक घेतली. त्यानंतर वनमंत्री राठोड यांच्याशी चर्चा केली. या नरभक्षी वाघाला गोळ्या झाडा, अशी मागणही त्यांनी चर्चेत केली.

Web Title: Kill the tiger, the people's representatives gathered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.