चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:30 PM2019-03-28T13:30:01+5:302019-03-28T13:31:10+5:30

दक्षिण वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या रामपुरी ते एकाराच्या मध्यभागी म्हणजेच रामपुरीपासून ४ किमी अंतरावर असलेल्या जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात इसम ठार झाला.

Killed in tiger attack in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

Next
ठळक मुद्देपुन्हा वाघ-मानव संघर्ष सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दक्षिण वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या अर्जुनी बिट एकारा कक्ष क्रमांक १५५/१५६ अंतर्गत रामपुरी ते एकाराच्या मध्यभागी म्हणजेच रामपुरीपासून ४ किमी अंतरावर असलेल्या जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात इसम ठार झाला.
सदर घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. जानकीराम शंकर भलावी (५०) असे मृतक इसमाचे नाव आहे.
जानकीराम, त्यांच्या पत्नी व गावातील इतर काही जण सकाळच्या सुमारास गावाला लागून असलेल्या असलेल्या जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेले होते. पत्नी आणि इतर नागरिक जंगलात आजूबाजूला मोहफुल वेचत होते तर मृतक दुसऱ्या बाजूला मोहफुल वेचत असताना अचानक पट्टेदार वाघाने हल्ला चढविला. त्यानंतर त्यांना एक किमीपर्यंत फरफटत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीला घटनास्थळी जानकीराम यांच्या पायातील चपला, कपडे अस्ताव्यस्त व फाटलेल्या अवस्थेत दिसून आले. तिने याबाबत आपल्या सहकाऱ्यांना माहिती दिली. शोध घेतला असता एक किमी अंतरावर जानकीरामचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती गावकऱ्यांना देताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकरणाची माहिती ब्रम्हपुरी वनविभागाला व पोलिसांना दिली. घटनास्थळी दक्षिण वनपरिक्षेत्राचे अधिकारी नायगमकर, गरमळे, राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.

गावकऱ्यांत पुन्हा दहशत
आजपर्यंत या परिसरात १० नागरिकांचा बळी वाघाने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पद्मापुर परिसरातील एका वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात येऊन गोरेवाड्यात नेले होते. त्यानंतर आता पुन्हा एका वाघाने जानकीराम यांना ठार केले. त्यामुळे पुन्हा एकदा सदर परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे

दक्षिण वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या या जंगल परिसरात किमान पाच ते सहा वाघांचा वावर असून परिसरातील नागरिकांनी मोहफुल वेचण्यासाठी जंगलात जाऊ नये आणि खबरदारी घ्यावी.
- जी. आर. नायगमकर
दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी, ब्रह्मपुरी.

Web Title: Killed in tiger attack in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ