न्यायप्रविष्ठ १६ जनावरांचा कोंडमारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:00 AM2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:05+5:30
सहा महिन्यांपूर्वी कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून जनावरांचा जीव वाचविण्यात जिवती पोलिसांना यश मिळाले. २२ जनावरे निर्दयपणे भरून वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करून जनावरे नगरपंचायतच्या ताब्यात देण्यात आली. मात्र जनावरांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने सहा जनावरांचा मृत्यू झाला. आजही स्थिती बदलली नाही.
शंकर चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : येथील नगरपंचायतच्या कोंडवाड्यात ताब्यात असलेली न्यायप्रविष्ठ मुक्या जनावरांचे हाल सुरू आहे. चारा, पाणी, आरोग्य व स्वच्छतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले. शिवाय जवळच्या नागरिकांनाही डासांचा प्रचंड त्रास होत आहे. २२ जनावरांपैकी सहा जनावारांचा मृत्यू झाल्याने १६ जनावरांचा श्वास कधी मोकळा होणार, असा प्रश्न गावकरी विचारत आहे.
सहा महिन्यांपूर्वी कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून जनावरांचा जीव वाचविण्यात जिवती पोलिसांना यश मिळाले. २२ जनावरे निर्दयपणे भरून वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करून जनावरे नगरपंचायतच्या ताब्यात देण्यात आली. मात्र जनावरांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने सहा जनावरांचा मृत्यू झाला. आजही स्थिती बदलली नाही. कोंडवाडा रक्षकाचे कुठलेही पद मंजूर नसून सध्या न.पंच्या सफाई कामगारांकडूनच जनावरांना चारा व पाण्याची सोय केली जात आहे. मात्र पावसाळा सुरु झाल्याने जनावरांना सोय करण्यास सफाई कामगारांना नाकी नऊ येत आहे.
गोरक्षण करणाºया संस्थांशी संपर्कात आहोत. मात्र, त्यांच्याकडे गोवंश ठेवण्याची सध्या व्यवस्था नाही. जागा उपलब्ध होताच गोवंश सुरक्षित ठिकाणी नेण्यात येणार आहे.
- विश्वास पुल्लरवार, सहायक पोलीस निरीक्षक, जिवती
सर्वच जनावरांची एकत्र व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काही शर्थीवर जनावरे उपलब्ध करून दिल्यास कुणावरही बोझा पडणार नाही. गोवंशाची देखरेखही होईल.
- डॉ. अंकुश गोतावळे, पशुप्रेमी, जिवती
स्वतंत्र कोंडवाडा व रक्षकाचे पद नाही. त्यामुळे गोवंशाचे हाल होत आहे. पोलीस प्रशासनाने गोवंशाच्या निवासासाठी न्यायालयाशी व्यवहार केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल.
- वरद थोरात, प्रशासकीय अधिकारी न. पं. जिवती