वाहानगाव -खुरसापार मार्गावर चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:23 AM2021-07-25T04:23:22+5:302021-07-25T04:23:22+5:30

सुमारे २० वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, आता केवळ रस्त्यावर चिखल उरले आहे. वाहानगाव, खानगाव, बोथली ...

The kingdom of mud on the Wahangaon-Khursapar road | वाहानगाव -खुरसापार मार्गावर चिखलाचे साम्राज्य

वाहानगाव -खुरसापार मार्गावर चिखलाचे साम्राज्य

googlenewsNext

सुमारे २० वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, आता केवळ रस्त्यावर चिखल उरले आहे. वाहानगाव, खानगाव, बोथली व परिसरातील काही गावांना वर्धा जिल्ह्यात कामानिमित्त, आरोग्याच्या दृष्टीने सेवाग्राम, सांवगी येथे जाण्याकरिता खुर्सापार-आमडी- कोरा हा रस्ता सोयीचा आहे. २० वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. या मार्गाने चिमूर वाहानगाव-आमडी-कोरा-गिरडमार्गे बससेवा सुरू होती. मात्र, काही वर्षात रस्ता पूर्ण उखडल्याने बससेवा बंद करण्यात आली. साधारणतः अठरा वर्षापूर्वी या मार्गाचे खडीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून या रस्त्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष घालून या मार्गाचे काम करून शेतकरी, नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे

-----------------–-

वाहानगाव ते खुरसापार रस्त्याच्या निर्मितीपासून येथे डागडुजी करण्यात आली नाही त्यामुळे हा रस्ता उखळला आहे व पावसाने चिखल झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा जीप बांधकाम विभागाने दखल घेऊन दुरुस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. -

प्रशांत कोल्हे,

सरपंच, वाहानगाव

240721\img-20210721-wa0021.jpg

वाहांनगाव- खुरसापार रस्त्याचे बोलके चित्र

Web Title: The kingdom of mud on the Wahangaon-Khursapar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.