किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:44 PM2019-03-19T22:44:43+5:302019-03-19T22:44:55+5:30
राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त किसानपुत्रांनी मंगळवारी महात्मा गांधी चौकात सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता अन्नत्याग आंदोलन केले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह १९ मार्च १९८६ ला सामूहिक आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त किसानपुत्रांनी मंगळवारी महात्मा गांधी चौकात सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता अन्नत्याग आंदोलन केले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह १९ मार्च १९८६ ला सामूहिक आत्महत्या केली.
राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या होती. तेव्हापासून आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी गळफास लावून केल्या. या आत्महत्या वाढतच आहेत. पण, शासनाने चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली नाही. सरकारचे डोळे उघडण्यासाठी हे राज्यव्यापर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, किसानपुत्र फाउंडेशन, भूमीपुत्र युवा एकता बहुउद्देशीय संस्था, मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, जनसेवा विकास सेना, युथ चांदा ब्रिगेड, इको प्रो, मराठा सेवा संघ, स्वाभिमानी कुणबी संघटना, धर्मराज्य पक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, सावित्रीबाई फुले ज्ञानदीप बहुउद्देशीय संस्था, युथ आॅफ चांदा व चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.