किशोर जोरगेवार यांनी पकडली दारू तस्करी करणारी सात वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 11:18 AM2021-01-20T11:18:26+5:302021-01-20T11:20:06+5:30
Chandrapur News चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांची दारु तस्करांवर धडक कारवाई करण्यात आली. पडोली फाट्याजवळ दारू घेऊन जाणारी सात वाहने पकडली .
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांची दारु तस्करांवर धडक कारवाई करण्यात आली. पडोली फाट्याजवळ दारू घेऊन जाणारी सात वाहने पकडली . यामध्ये दारू विक्रेत्यांचे पेट्रोलिंग करणारे वाहनही होते. सुमारे 25 चारचाकी वाहनाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. खुद्द आमदाराने केलेल्या या कारवाईने पोलीस प्रशासन चांगलेच हादरले आहे.