लालपरीत पुन्हा खटखट; चारही आगारातील ४९२ पैकी २६८ तिकीट मशीन नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:30 AM2021-07-27T04:30:04+5:302021-07-27T04:30:04+5:30
चंद्रपूर : प्रवाशांना स्मार्ट टिकीट देण्याच्या अनुषंगाने महामंडळाने तिकीट मशीनचा वापर सुरू केला. मात्र सद्यस्थितीत बहुतांश मशीनमध्ये बिघाड झाल्याचे ...
चंद्रपूर : प्रवाशांना स्मार्ट टिकीट देण्याच्या अनुषंगाने महामंडळाने तिकीट मशीनचा वापर सुरू केला. मात्र सद्यस्थितीत बहुतांश मशीनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी पुन्हा जुन्याच तिकिटांचा वापर करावा लागत आहे.
जिल्ह्यातील चार आगारांसाठी सन २०१० मध्ये ४९१ तिकीट मशीनचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी २६८ बंद आहेत.
कोट
ज्या मशीनमध्ये बिघाड झाला आहे त्या मशीन दुरुस्तीसाठी पाठविल्या जातात. जर वेळेवर मशीन उपलब्ध नसेल तर वाहक जुन्या तिकिटांचा वापर करीत असतो. अडचणीच्या वेळेसाठी म्हणून जुन्या तिकिटांचा स्टॉक उपलब्ध आहे.
-स्मिता सुतवणे, विभागीय नियंत्रक, चंद्रपूरबॉक्स
वाहकांची पुन्हा आकड्यांची जळवाजुळव
तिकीट मशीनमध्ये गावाच्या नावावर क्लिक केल्यानंतर लगेच प्रिंट निघत होती. त्यामुळे वाहकाला सुलभ पडत होते. परंतु, आता वाहकाला तिकीट दर किती आहे ते बघावे लागते. त्यानंतर तेवढ्या दरांची आकडेमोड करीत तिकीट फाडावे लागते. त्यामुळे पुन्हा वाहकाला डोईजड होत आहे.
बॉक्स
अनेक मशीनमधून प्रिंटच निघेना
वाहकांना दिलेल्या मशीनमध्ये विविध प्रकारचे बिघाड आढळून येत आहेत. काही मशीनची चार्जिंग फुल्ल दाखवत असताना लगेच उतरते. तर काही मशीनमधून प्रिंटच निघत नसल्याचे चित्र बघावयास मिळते.
बॉक्स
कोरोनानंतर सर्वात श्रीमंत समजल्या जाणारा एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अद्यापही प्रवाशांची संख्या वाढली नसल्याने उत्पन्नात घट झाली आहे.
बॉक्स
काय म्हणतेय आकडेवारी
जिल्ह्यात चंद्रपूर, चिमूर, वरोरा, राजुरा असे चार आगार आहेत. या आगारात सन २०१० मध्ये ४९२ तिकीट मशीनचा पुरवठा करण्यात आला. मध्यंतरी काही मशीनमध्ये रिप्लेसमेंट करण्यात आली. परंतु, आताही चारही आगारातील २६९ मशीन बंद अवस्थेत असल्याने पुन्हा जुन्या तिकिटरंचा आधार घ्यावा लागत आहे.