कोरपनाला लाभले ५३ तहसीलदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:29 AM2021-01-03T04:29:36+5:302021-01-03T04:29:36+5:30
कोरपना : १५ ऑगस्ट १९९२ ला राजुरा तालुक्याचे विभाजन होऊन कोरपना तालुक्याची निर्मिती झाली. याला २८ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी ...
कोरपना : १५ ऑगस्ट १९९२ ला राजुरा तालुक्याचे विभाजन होऊन कोरपना तालुक्याची निर्मिती झाली. याला २८ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला. यात आजतागयत पदतालिकेनुसार ५३ तहसीलदारांनी यशस्वी धुरा सांभाळली.
पूर्वेस राजुरा तालुका, पश्चिमेस तेलंगणा राज्य, उत्तरेस यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर तालुका, दक्षिणेस जिवती तालुक्याची सीमा लाभलेल्या कोरपना तालुक्यात सद्यस्थितीत ११३ गावाचा समावेश आहे. तालुक्याच्या निर्मितीनंतर या तालुक्यात १८२ गावे होती. २००२ मध्ये ६९ गावे नवनिर्मित जिवती तालुक्याला जोडली गेली. ५२ ग्राम पंचायती, एक नगर पंचायत, एक नगर परिषद असलेला हा तालुका जिल्ह्यात औद्योगिक व शेतीप्रधान म्हणून सर्वदूर परिचित आहे. या तालुक्याला आजपर्यंत पद तालिकेनुसार ५३ तहसीलदार लाभले. यामध्ये ३८ व्यक्तींचा समावेश आहे. जी.व्ही. मेहता कोरपनाचे पहिले तहसीलदार असून एम.यू.वाकलेकर विद्यमान तहसीलदार आहे. सुरुवातीला तहसील कार्यालय बाजारवाडी परिसरातील जुनी सराय इमारतीत होते. २००० मधे हे कार्यालय नवीन प्रशासकीय भवनात स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे येथील कारभार सुसज्ज इमारतीत सुरू झाला.
बॉक्स
आजपर्यंतचे कोरपनाचे तहसीलदार
जी. व्ही. मेहता, एम ए खान, सी. व्ही. मेहता, ए.जी. पुटलवार, राजन जाधव , एस.बी. वैरागडे, वी. एस. मून, वी. के. मादरबोईना, एन. धकाते, आर चौधरी, आर. एन. खांडे, वी. जे. वाटेकर, आर. एन. चांदेकर, ओ. आर. चौधरी, एस. सी. दीक्षित, अब्दुल कादर, एस.पी. माडकर, डब्ल्यू. एस. खंडाळे, एस.डी. मालखेडे, एन.सी. मोहितकर, प्रमोद कदम, मदन खाडिलकर, एस. डी. चंदावार,एम. जी. कस्तुरकर, एस. आर. पुपलवार,एच. टी. झीरवाड, डी. वी. आत्राम, पी.के. कुमरे,पी.बी. गिरसावले, एम.टी. वलथरे, यू. एस. गेडाम, पी. एस. मेश्राम, पी.एच. मरस्कोले, बिपीन पाटील, एस. एच. मडावी, हरीश गाडे, डॉ. सिद्धार्थ मोरे, एम. यू. वाकलेकर आदींचा समावेश आहे. यात झिरवाळ यांनी तीनदा, पुष्पलता कुमरे यांनी दोनदा तहसीलदार तर गिरसावले, कदम, वैरागडे, आर चौधरी, कस्तुरकर यांनी प्रत्येकी दोन, दीक्षित यांनी पाचदा प्रभारी तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळला आहे.