कोरपनातील कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:08+5:302021-03-21T04:27:08+5:30
या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालय, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, उपकोषागार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प , ...
या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालय, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, उपकोषागार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प , सहाय्यक निबंधक , कृषी उत्पन्न बाजार समिती, भूमी अभिलेख, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आदी कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यासह कर्मचारी अप-डाऊनलाच पसंती देताना दिसतात. त्यामुळे मुख्यालयी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जेमतेमच आहे. या स्थळी गडचांदूर, वणी ,राजुरा , चंद्रपूर,वरोरा, बल्लारपूर, भद्रावती, नागपूर, आदिलाबाद आदी ठिकाणावरून कर्मचारी अपडाऊन करतात. त्यामुळे त्यांना यायला अनेकदा विलंब होतो. तसेच बरेच कर्मचारी वेळेआधीच निघून जात असल्याने कामे रेंगाळली जात आहे. याचा फटका मात्र दूर अंतरावरुन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसत आहे. बऱ्याच कार्यालयात अनेक पदे रिक्त असल्याने कामकाजाचा भारही कार्यरत कर्मचाऱ्यावर वाढला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रिक्त पदे भरावी व मुख्यालयाची सक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.