कोरपना तालुका अनेक सुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:33+5:302021-05-10T04:27:33+5:30
या ठिकाणी बसस्थानक, राष्ट्रीयीकृत बँक, विज्ञान, वाणिज्य पदवी, पदव्युत्तर महाविद्यालय, अधिकृत गॅस एजन्सी आदी सुविधा नाहीत. क्रीडा संकुलाचेही काम ...
या ठिकाणी बसस्थानक, राष्ट्रीयीकृत बँक, विज्ञान, वाणिज्य पदवी, पदव्युत्तर महाविद्यालय, अधिकृत गॅस एजन्सी
आदी सुविधा नाहीत. क्रीडा संकुलाचेही काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होत आहे. या स्थानी विद्यार्थ्यांना बस पास सेवा शिबिर, वाहतूक परवाना शिबिर घेण्यात येत नाही. वीज बिल कनेक्शन, नवीन कृषिपंप वीज जोडणी, बीएसएनएल नवीन कनेक्शन, सिम खरेदी आदी कामासाठी बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर येथे जावे लागते आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र सुरू असताना येथील ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था नाही. परिणामी रुग्णांना चंद्रपूर येथे रेफर केल्याशिवाय पर्याय नाही. या अनुषंगाने या रुग्णालयाचा दर्जा वाढ करून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरण गरजेचे आहे. या स्थानी स्त्रीरोग तज्ज्ञांसह अन्य तज्ज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. यासह सिटीस्कॅन, एक्सरे आदी आधुनिक तंत्रज्ञान उपचार पद्धती कार्यान्वित होणे गरजेचे आहे. सर्व तालुकास्थानी १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. मात्र, येथे अजूनही केंद्र देण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक लसीपासून वंचित आहे.
बॉक्स
शासकीय कार्यालयातही पदे रिक्त
येथील अनेक शासकीय कार्यालयात अनेक पदे रिक्त आहे. ते भरणे गरजेचे असून कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करणे आवश्यक आहे; परंतु याकडे त्या कार्यालयाचे प्रमुख अधिकारीच नियमाला छेद देत आहे. तालुका पातळीवरील अनेक शासकीय कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्याचेही स्थलांतरण व विभाजन प्रक्रिया राजकीय इच्छाशक्तीअभावी रखडली आहे.
यावर आता तरी योग्य पावले उचलावी, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.