महाराष्ट्र् तेलंगणा सीमेवरील कोष्टाळा-अंतरगाव डोंगरात वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:23+5:302021-03-08T04:27:23+5:30

विरुर स्टेशन : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील डोंगराळ भागातील चार दिवसांपासून जंगलात लागलेली आग नियंत्रणात आणण्यात विरुर वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांची ...

In the Kostala-Antargaon hills on the Maharashtra-Telangana border | महाराष्ट्र् तेलंगणा सीमेवरील कोष्टाळा-अंतरगाव डोंगरात वणवा

महाराष्ट्र् तेलंगणा सीमेवरील कोष्टाळा-अंतरगाव डोंगरात वणवा

Next

विरुर स्टेशन : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील डोंगराळ भागातील चार दिवसांपासून जंगलात लागलेली आग नियंत्रणात आणण्यात विरुर वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. अपुरे मनुष्यबळ आणि आग नियंत्रण साहित्य व त्याची देखभाल, निधी अपुरा असल्याने वणवा नियंत्रण केवळ फार्स ठरत आहे.

दरवर्षी मार्च महिना सुरू होताच जंगलात आग लागते. विरुर वनपरिक्षेत्राचे बहुतांश वनक्षेत्र हे तेलंगणा सीमेवर असून दुर्गम पहाडीने वेढलेले आहे. शिवाय अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे, नियमित गस्त करणे अवघड असतानाच उन्हाळ्यात लागणारी आग नियंत्रणात आणणे वन कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. मागील चार दिवसांपासून या वन क्षेत्रात आग लागली आहे. ही आग तेलंगणा सीमेतून पसरत महाराष्ट्र जंगलात पसरली आहे. याबाबत तेलंगणात शिरपूर येथील वन अधिकारी यांना विरुर कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. तरीपण तेलंगणा वन अधिकारी यांचेकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे समजते. तसेच सॅटेलाईटद्वारे आगीची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला सांगण्यात आले नाही, असे उत्तर दिले जाते. या अशा असहकार्यामुळे सीमेवरील पहाडी जंगलातील आग नियंत्रणात आणण्यासाठी विरुर वनक्षेत्राचे कोष्टाळा,अंतरगाव,देवाडा येथील वन कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मार्च महिना सुरू होताच वन क्षेत्रात आग लागण्याच्या घटना घडत असतात. नैसर्गिक आगीस कारणीभूत वनस्पती,बांबू हे मोठ्या प्रमाणात मध्य चांदा वन विभागातील वनक्षेत्रात नसतानाही दरवर्षी आग लागली जात आहे. अजूनपर्यत आग कशी लागली,कुणी लावली हे स्पष्ट झाले नाही. असे असतानाही या आगीस मोहफुल गोळा करणारे मजूर,गुराखी तसेच तेंदूपाने चांगले यावे म्हणून तेंदू ठेकेदाराचे मजूर कारणीभूत असल्याचा संशय वन अधिकारी व्यक्त करीत आहेत. दरवर्षी जंगलात आग लागू नये किंवा ती आग इतरत्र पसरू नये म्हणून विशेष निधी अंतर्गत हंगामी अग्निरक्षक वनमजूर तयार केले जातात. तसेच प्रत्येक नियत वनक्षेत्रात अग्नी जाळ रेषा काढून ती जाळली जाते. परंतु हा प्रयत्न सुद्धा मानवी हस्तक्षेपात अपूर्ण पडत आहे.

Web Title: In the Kostala-Antargaon hills on the Maharashtra-Telangana border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.