कोतवालांचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:55 PM2018-12-27T22:55:22+5:302018-12-27T22:55:51+5:30
कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना पेन्शन लागू करावे, सुशिक्षित कोतवालांना लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने १९ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी पोंभूर्णा तहसील कार्यालयासमोरही बेमुदत आंदोलन सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोसरी : कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना पेन्शन लागू करावे, सुशिक्षित कोतवालांना लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने १९ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी पोंभूर्णा तहसील कार्यालयासमोरही बेमुदत आंदोलन सुरू आहे.
३० डिसेंबरपर्यंत कोतवालांना चतूर्थ श्रेणीत समाविष्ट करावे, अशी प्रमुख मागणी कोतवाल संघटनेने केली आहे. कोतवाल हा महसुल विभागाचा प्रमुख घटक अहे. मात्र अल्प मानधन दिल्या जाते. कमी मानधनात कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. कोतवालांना महसुल गोळा करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात सुचना देणे, नोटीस तामील करणे, कृषी गणना, संगणक सातबारा रेकार्ड तसेच निवडणुकीच्या काळात अनेक जबाबदाऱ्या दिल्या जातात. कोतवालांना चतूर्थ श्रेणी मिळावी, यासाठी आंदोलने करून शासनाला वेळोवेळी निवेदन दिली. पण मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कोतवाल संघटनेने केला आहे. ३० डिसेंबरपर्यंत शासनाने दखल घेतली नाही तर राज्य संघटनेच्या नेतृत्वात ३१ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेने दिली.
राजुऱ्यातही आंदोलन
राजुरा : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका शाखेकडून राज्य कोतवाल संघटनाद्वार २१ डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चा व उपोषण करून शासनाला निवेदन देण्यात आले. मागील ५० वर्षांपासून कोतवालांना न्याय मिळाला नाही. शासनाची विविध कामे करूनही त्यांची उपेक्षा केली जात आहे, असा आरोप संघटनेने केला. वारंवार पाठपुरावा करूनही उपेक्षा वाटल्याला येत असल्याने राज्य कोतवाल संघटनेच्या नेतृत्व बेमुदत काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसण्यात आले. कोतवालच्या वारसांना पेंशन लागू करण्यात यावे, लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण देण्याची मागणीही संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चेन्नूरवार, सचिव मारोती मेश्राम यांनी निवेदनात नमूद केली आहे. दरम्यान, आंदोलन सुरू असल्याने तालुक्यातील अनेक कामांवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तलाठ्यांची महत्त्वपूर्ण कामे रखळली आहेत.