300 बालकांना कोविड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 05:00 AM2020-11-19T05:00:00+5:302020-11-19T05:00:26+5:30

बुधवारी मृत झालेल्या बाधितामध्ये रेल्वे कॉलनी चंद्रपूर येथील ८० वर्षीय पुरूष व भारळा ता. वरोरा येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५७ बाधितांचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १०७ बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १७ हजार ९५१ वर पोहोचली आहे. 

Kovid to 300 children | 300 बालकांना कोविड

300 बालकांना कोविड

Next
ठळक मुद्देनवे १०७ बाधित : लक्षणे दिसताच बालकांना ठेवा दूर

 लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंत ० ते ५ वयोगटातील तब्बल २९९ बालकांना कोरोना विषाणूने आपल्या कवेत घेतले आहे. बालकांना हा आजार निश्चितच पालक व किंवा नातेवाईकांकडून होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पालकांना किंवा घरात येणाºया कोण्याही व्यक्तींमध्ये लक्षणे दिसली की बालकांना त्यांच्यापासून दूर ठेवणे आता गरजेचे झाले आहे. 
बुधवारी १०७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून ६१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी मृत झालेल्या बाधितामध्ये रेल्वे कॉलनी चंद्रपूर येथील ८० वर्षीय पुरूष व भारळा ता. वरोरा येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५७ बाधितांचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १०७ बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १७ हजार ९५१ वर पोहोचली आहे. 
तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १५ हजार ४८३ झाली आहे. सध्या दोन हजार १९१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३२ हजार १११ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे,  त्यापैकी एक लाख १२ हजार ५७० नमुने निगेटिव्ह आले आहे.
बाजारात गर्दी ओसरली, मात्र नियमांचे पालन नाही
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील बाजारपेठेत मागील चार-पाच दिवसांपासून तुंबळ गर्दी उसळली होती. ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या गर्दीमुळे आणि कापडाच्या दुकानातील ‘ट्रायल’ कोरोना संसर्गाची शक्यता बळावली होती. बुधवारपासून बाजारपेठेत गर्दी कमी झाली आहे. मात्र नागरिक अद्यापही नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसते. अनेकांच्या तोंडावर मास्क नसतो. सोशल डिस्टन्सिंग तर कोणत्याच दुकानात दिसून येत नाही. नागरिकांनी मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Kovid to 300 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.