कोविडमुळे २५७ बालकांचे एक, तर सात जणांचे दोन्ही पालक दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:12+5:302021-06-25T04:21:12+5:30

चंद्रपूर : कोविडमुळे जिल्ह्यातील २५७ बालकांचे एक पालक आणि सात जणांचे दोन्ही पालक दगावले. पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व ...

Kovid betrayed one of the 257 children and both parents of seven | कोविडमुळे २५७ बालकांचे एक, तर सात जणांचे दोन्ही पालक दगावले

कोविडमुळे २५७ बालकांचे एक, तर सात जणांचे दोन्ही पालक दगावले

Next

चंद्रपूर : कोविडमुळे जिल्ह्यातील २५७ बालकांचे एक पालक आणि सात जणांचे दोन्ही पालक दगावले. पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गुरुवारी आढावा घेऊन संबंधित विभागाला तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, मनपा सहायक आयुक्त विद्द्‌या पाटील, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा जामदार, महिला व बालकल्याण अधिकारी रमेश टेटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, स्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पालक गमाविलेल्या सर्व बालकांची स्वतंत्र फाईल तयार करावी. जेणेकरून परिपूर्ण प्रस्ताव तयार होऊन शासकीय योजनेचा लाभ देताना अडचण येणार नाही. प्रत्यक्ष भेटीदरम्यान निरीक्षणात आलेल्या बाबी, आर्थिक परिस्थिती व चर्चेतून मिळालेली सर्व माहिती फाईलमध्ये नोंदवावी. स्थावर मालमत्तेसंदर्भात ग्रामीण भागात ग्रामपंचायत, तर शहरी भागात संबंधित नगरपरिषदेला कळवावे. दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या स्थावर व इतर मालमत्तांबाबत जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, ज्या सात बालकांच्या दोन्ही पालकांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या बँकेच्या व्यवहारासंदर्भात बँकांना कळवावे. एक पालक गमाविलेल्या कुटुंबाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया राबवावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.

पालक गमावलेली बालके...

कोविडमुळे जिल्ह्यातील सात बालकांनी दोन्ही पालक गमाविले. त्यामध्ये चंद्रपूर व चिमूर येथील प्रत्येकी तीन बालके आणि सावली येथील एका बालकाचा समावेश आहे. एक पालक गमाविलेल्या बालकांची संख्या २५७ आहे. बालकल्याण समितीसमोर २६४ बालकांची यादी पुढील कार्यवाहीकरिता सादर करण्यात आली. यापैकी सद्यस्थितीत संजय गांधी निराधार योजनेसाठी मंजूर प्रकरणांची संख्या ३२ असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Web Title: Kovid betrayed one of the 257 children and both parents of seven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.