नागभीड तालुक्यात ९२६ योद्ध्यांना कोविडची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:43 AM2021-02-23T04:43:30+5:302021-02-23T04:43:30+5:30

या लसीबद्दल सर्वांनाच उत्सुकता असली तरी प्रारंभी सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनाच ही लस देण्यात येत आहे. तालुक्यात आतापर्यंत आरोग्यसेवक, ...

Kovid vaccine to 926 warriors in Nagbhid taluka | नागभीड तालुक्यात ९२६ योद्ध्यांना कोविडची लस

नागभीड तालुक्यात ९२६ योद्ध्यांना कोविडची लस

Next

या लसीबद्दल सर्वांनाच उत्सुकता असली तरी प्रारंभी सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनाच ही लस देण्यात येत आहे. तालुक्यात आतापर्यंत आरोग्यसेवक, शासकीय डाॅक्टर, खासगी दवाखान्यातील डाॅक्टर व त्यांचे मदतनीस, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलातील जवान यांनाच ही लस देण्यात आली आहे.

लसीकरणाची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून, प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. नागभीड तालुक्यात अतिशय नियोजनबद्ध लसीकरणाची ही मोहीम सुरू आहे.

कोट

आतापर्यंत ९२६ व्यक्तींना ही लस देण्यात आली. लसीबद्दल कोणतीही तक्रार आली नाही.

-डाॅ. श्रीकांत कामडी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, नागभीड

Web Title: Kovid vaccine to 926 warriors in Nagbhid taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.