कुडरारा चिरादेवी रस्त्याचे बांधकाम होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:16+5:302021-02-07T04:26:16+5:30
घोडपेठ : येथून जवळच असलेल्या कुडरारा येथील नागरिकांतर्फे कुडरारा ते चिरादेवी या पांदन रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे या मागणीसाठी ...
घोडपेठ : येथून जवळच असलेल्या कुडरारा येथील नागरिकांतर्फे कुडरारा ते चिरादेवी या पांदन रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे या मागणीसाठी अनेकदा निवेदन देण्यात आले होते. शेवटी या रस्त्याचे बांधकाम मंजूर करण्यात आल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
कुडरारा ते चिरादेवी हा पांदण रस्ता अस्तित्वात आहे. परिसरातील नागरिक तसेच शेतकरी शेतात ये-जा करण्याकरिता या मार्गाचा उपयोग करतात. मात्र पावसाळ्यात चिखलामुळे शेतात जाण्यायेण्याकरिता शेतकऱ्यांना भरपूर त्रास सहन करावा लागतो.
गोरजा येथील सरपंच अरूण टेकाम तसेच उपसरपंच श्रावणी घोरूडे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना १६ जून रोजी कुडरारा ते चिरादेवी पांदण रस्त्याचे बांधकाम करण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली होती. तसेच आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे सुद्धा याविषयी सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्यानुसार जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्या निधीतून सदर रस्त्याच्या बांधकामाकरिता १५ लक्ष रूपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुडरारा चिरादेवी या पांदण रस्ता बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोरजा येथील सरपंच अरूण टेकाम, उपसरपंच श्रावणी प्रफुल घोरुडे व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.