बाहुबली-२ मध्ये झळकला चंद्रपूरचा कुमार शेट्टी

By admin | Published: May 10, 2017 12:54 AM2017-05-10T00:54:16+5:302017-05-10T00:54:16+5:30

येथील नटराज डॉन्स इन्स्टीट्युटचा विद्यार्थी कुमार शेट्टी या या युवकांनी आपल्या नृत्यकलागुणाच्या आधारावर चंद्रपूरचे नाव उज्वल केले आहे.

Kumar Shetty of Chandrapur walks in Bahubali-2 | बाहुबली-२ मध्ये झळकला चंद्रपूरचा कुमार शेट्टी

बाहुबली-२ मध्ये झळकला चंद्रपूरचा कुमार शेट्टी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील नटराज डॉन्स इन्स्टीट्युटचा विद्यार्थी कुमार शेट्टी या या युवकांनी आपल्या नृत्यकलागुणाच्या आधारावर चंद्रपूरचे नाव उज्वल केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाहुबली-२ या चित्रपटात तो पार्श्वनृत्य करताना झळकला आहे.
इंदिरानगर येथील रहिवासी कुमारने या अगोदर शाहरूख खान, जॉन अब्राहम, प्रभुदेवा, चिरंजीव या सारखे मोठ मोठ्या कलाकारांना सोबत काम केलं आहे. कुमार शेट्टी याने आपल्यामध्ये असलेल्या नृत्य कला गुणाच्या जोरावर बॉलीवूड व दक्षिणात्य फिल्म जगतामध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे.कुमारने या बाहुबली चित्रपटात नृत्य केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यावेळी नृत्य प्रशिक्षक अब्दूल जावेद यांनी नृत्य क्षेत्रामध्ये अधिकाधिक यश मिळावावे व तो एक नृत्य कोरीयोग्राफर म्हणून प्रसिध्द व्हावा. अशा शुभेच्या दिल्या. तसेच नटराज डॉन्स इन्स्ट्टियुटचे इन्स्ट्रक्टर सुरज पेंदाम, सचिव धोतरे, राहुल उपरे, अक्षय लोणारे, विक्रांत आले. गणेश पायघन, लोकमत युवा नेक्ट्स या सर्वांनी कुमार शेट्टीला शुभेच्छा दिल्या.

Web Title: Kumar Shetty of Chandrapur walks in Bahubali-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.