रंग मारताना सिडीवरून पडून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:25 AM2021-03-20T04:25:49+5:302021-03-20T04:25:49+5:30
गुजरी चौकात असलेल्या मूल नगर परिषदेच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तीन मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, ...
गुजरी चौकात असलेल्या मूल नगर परिषदेच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तीन मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, इमारतीला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. इमारत तीन मजली असल्याने दोरावर सिडी तयार करून बाहेरून रंग मारणे गरजेचे आहे. त्यामुळे पंकज प्रभाकर खोबरागडे (३२, रा. मूल) हा गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास दोरावरील झुल्यावर बसून तिसऱ्या माळ्यावर रंग मारत असताना अचानक सिडीसहीत जमिनीवर कोसळला. पंकज खोबरागडे जमिनीवर पडताच आजुबाजुला असलेले लोक व सदर कामाच्या कंत्राटदाराने जखमी पंकजला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. परंतु पंकजच्या कंबर आणि पाठीला जबर दुखापत झाल्याने त्याला चंद्रपूर येथील डाॅ. प्रफुल आंबटकर यांच्याकडे हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाही पंकजच्या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास पंकजचे निधन झाले.