पाण्याची टाकी कोसळून एक मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:28 AM2021-05-13T04:28:55+5:302021-05-13T04:28:55+5:30
फोटो मूल : मूल तालुक्यातील मौजा केळझर येथील नदीवर असलेली पाण्याची टाकी कोसळल्याने मोटरपंप लावण्यासाठी गेलेल्या पुंडलिक रवि मराठे ...
फोटो
मूल : मूल तालुक्यातील मौजा केळझर येथील नदीवर असलेली पाण्याची टाकी कोसळल्याने मोटरपंप लावण्यासाठी गेलेल्या पुंडलिक रवि मराठे (२५) या मजूर युवकाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली.
मागील तीन-चार दिवसांपासून केळझर येथील पाणीपुरवठा करणारे मोटारपंप बिघडल्याने, पंप दुरुस्त करण्यासाठी बुधवारी ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रकाश गड्डमवार यांनी मिस्त्री व भास्कर मराठे आणि पुंडलिक मराठे या मजुरांना सोबत घेऊन पंप लावण्याकरिता गेले होते. नालीचा उपसा करत असताना, आधीच भेगा गेलेली पाण्याची टाकी कोसळल्याने त्यात पुंडलिक मराठे दबून जागीच ठार झाला. पुंडलिक मराठे याला तीन वर्षांचा आणि चार महिन्याचा मुलगा आहे.
घटनास्थळाला प्रभारी तहसीलदार यशवंत पवार, सवर्ग विकास अधिकारी डॉ.मयूर कळसे, ठाणेदार सतीशसिंह राजपूत, सरपंच काजू खोब्रागडे यांनी भेट दिली.