कष्टकरी शेतकऱ्यांची झोळी अजूनही रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2017 12:48 AM2017-01-25T00:48:21+5:302017-01-25T00:48:21+5:30

शेतमालाच्या दरवाढीवरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा पसारा अवलंबून आहे. सध्या कापूस वगळता सर्वच शेतमालाचे भाव पडले आहेत.

The laborers of the working peasants are still empty | कष्टकरी शेतकऱ्यांची झोळी अजूनही रिकामीच

कष्टकरी शेतकऱ्यांची झोळी अजूनही रिकामीच

Next

शेतमालाच्या दरवाढीची आशा मावळली : कापूस वगळता शेतमालाचे भाव पडले
गोवरी : शेतमालाच्या दरवाढीवरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा पसारा अवलंबून आहे. सध्या कापूस वगळता सर्वच शेतमालाचे भाव पडले आहेत. मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. आज ना उद्या शेतमालाचे भाव वाढेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतमालाच्या दरवाढीअभावी परवड झाल्याने शेतकऱ्यांची झोळी अजूनही रितीच आहे.
शेतकरी दिवसंरात्र शेतात राबतो. परंतु शेतकऱ्यांच्या पाठिशी आज कुणीही उरला नाही. त्यामुळे शेतकरी कायमचा निराधार झाला आहे. शेतातील पिकलेला माल घरी आल्यावर शेतमालाचे भाव पाडले जाते. ही या देशातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी कशीबशी शेती पिकविली.
परंतु शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन खर्चापेक्षा शेतमालाला मिळणारा दर तोकडा आहे. हा कालआजचा अनुभव नाही तर गेल्या ५० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या बाबतीत हेच घडत आहे.
यावर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव आहे. मात्र कापूस वगळता सोयाबीन, तूर, ज्वारी, गहु, हरभरा, या नगदी पिकांचे भाव पडले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा यापेक्षा वेगळी नाही. धानाला दोन हजार रुपयाच्यावर भाव चढत नाही. मग शेतकऱ्यांनी केवळ शेतातच राबायचे काय? या प्रश्नाचे उत्तर अजूनही आमच्या मायबाप सरकारला शोधता आलेले नाही.
शेतमालाला तोकडा दर असल्याने शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. उत्पादन खर्च वाढला, त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढणे अपेक्षित आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या बाबतीत आजपर्यंत उलटच घडत आहे. पुर्वीसारखा आज शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर कोणताही राजकीय नेता पेटून उठताना दिसत नाही.
एखाद्या शेतकरी नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला तर सरकार त्याचा आवाज दाबून टाकतात. ना पुढारी, ना सरकार पाठिशी, मग शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काचा न्याय मागायचा कुणाकडे? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही अनुत्तरीतच आहे. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करुनही शेतकऱ्यांना ‘घामाचे दाम मिळत नाही’ त्यामुळे शेतात राबूनही शेतकऱ्यांची झोळी अजूनही रितीच आहे. (वार्ताहर)

शेतकऱ्यांचे
‘अच्छे दिन’ गेले कुठे?
शेतकऱ्यांचे अच्छे दिन येईल, असे स्वप्न निवडणुकीपूर्वी भाजपा सरकारने दाखविले होते. शेतकऱ्यांनाही आपले सुखाचे दिवस येईल, अशी आस होती. मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अच्छे दिनच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला आहे.

Web Title: The laborers of the working peasants are still empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.