तळोधीत कोरोना लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:39+5:302021-04-30T04:36:39+5:30

नागरिकांना माराव्या लागतात दवाखान्यात चकरा तळोधी बा. - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू झाले. मात्र येथे लसीचा तुटवडा ...

Lack of corona vaccine at the bottom | तळोधीत कोरोना लसीचा तुटवडा

तळोधीत कोरोना लसीचा तुटवडा

Next

नागरिकांना माराव्या लागतात दवाखान्यात चकरा

तळोधी बा. - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू झाले. मात्र येथे लसीचा तुटवडा असल्याने रिकाम्या हाताने नागरिकांना परत जावे लागते.

कोरोना रुग्णाचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्राफ वाढला आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी आवाहन केले जात असताना मात्र तळोधी बा. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारला लसीच्या तुटवड्यामुळे केवळ ११ लोकांना लसीकरण करण्यात आले. यात काही लोकांना प्रथम डोस तर काही लोक दुसरा डोस घेण्यासाठी येतात. मात्र नागरिकांना लस तुटवड्याची कल्पना नसल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना दवाखान्यात येऊन रिकाम्या हाताने परत जावे लागते. हा प्रकार नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. आरोग्य विभागाने लक्ष देऊन तळोधी बा. येथील केंद्रात लसी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Lack of corona vaccine at the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.