डोसअभावी लसीकरणाची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:19 AM2021-06-10T04:19:58+5:302021-06-10T04:19:58+5:30
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ३०० पेक्षा जास्त केंद्रे तयार केली. चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील ७० पेक्षा जास्त केंद्रे ...
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ३०० पेक्षा जास्त केंद्रे तयार केली. चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील ७० पेक्षा जास्त केंद्रे आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद राहतात. प्रत्येक केंद्राला १०० ते ८० डोस मिळत आहेत. त्यामुळे ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना लस मिळणे कठीण झाले. आरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी दहा वाजता लसीकरणाला सुरुवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी चंद्रपूर मनपाने कुपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढे डोस आले तेवढेच कुपन आधी वितरित केले जातात. नागरिक पहिल्यांदा कुपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात डोस किती आहेत, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जात नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.