यात्रा स्थळांना सुविधेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:40+5:302021-08-17T04:33:40+5:30
लिलावाअभावी वाहने धूळ खात चंद्रपूर :येथील राम नगर आणि शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेली वाहने लिलावाअभावी अद्यापही धूळ ...
लिलावाअभावी वाहने धूळ खात
चंद्रपूर :येथील राम नगर आणि शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेली वाहने लिलावाअभावी अद्यापही धूळ खात आहेत. काही वाहने निकामी झाली असून, त्याचे स्पेअरपार्टही बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. या वाहनांचा लिलाव करण्याची मागणी आहे.
बचत गटांना प्रशिक्षण द्या
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचतगटांची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे; मात्र अद्यापही काही बचत गटांना प्रशिक्षण मिळाले नसल्याने त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे.
वस्त्यांमधील बागेकडे दुर्लक्ष
चंद्रपूर : चंद्रपुरातील वस्त्यांमधील प्रशासनाने बागेसाठी जागा आरक्षित केल्या आहेत. ज्या ठिकाणी बाग आहे, त्या बागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या बागांचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : शहरातील अनेक वार्डात घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाल्यांची स्वच्छता करून फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी वैतागले
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही भागात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिकांच्या रक्षणासाठी शेतकरी विविध उपाययोजना करीत आहेत. वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कचरा संकलकांचे वेतन वाढवा
चंद्रपूर : शहरातील कचरा संकलित करणाऱ्यांना अत्यल्प वेतन दिल्या जात असल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालन पोषण करताना मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागतो. लॉकडाऊनच्या काळामध्येही त्यांनी आपले कार्य चोख बजावले आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलकांचे वेतन वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.