गडचांदूर व कोरपणा येथे ऑक्सिजनयुक्त बेडचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:38+5:302021-05-09T04:28:38+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना व गडचांदूर या भागात कोरोना महामारीमुळे ऑक्सिजनयुक्त बेड अत्यंत कमी पडत आहेत. या दोन्ही ...

Lack of oxygen beds at Gadchandur and Korpana | गडचांदूर व कोरपणा येथे ऑक्सिजनयुक्त बेडचा अभाव

गडचांदूर व कोरपणा येथे ऑक्सिजनयुक्त बेडचा अभाव

Next

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना व गडचांदूर या भागात कोरोना महामारीमुळे ऑक्सिजनयुक्त बेड अत्यंत कमी पडत आहेत. या दोन्ही ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्याची मागणी नागरिक व शेतकरी संघटनेने केली आहे.

कोरपना तालुक्यात व औद्योगिक क्षेत्र असलेल्या गडचांदूर परिसरात कोरोना या महामारीचा प्रकोप फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना अपुरे असलेली बेडची संख्या भरल्यानंतर औषधोपचारासाठी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद, मंचेरिअल येथे जावे लागते. तेथील ट्रीटमेंट महाग असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. कोरपना व गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यकक्षेत व शेजारच्या गावांमध्ये कोविड मृत्युसंख्या सतत वाढत आहे.

कोरपना तालुक्यात कोरोना महामारीच्या प्रकोपावर नियंत्रण आणण्यासाठी व सर्वसामान्यांना परवडणारी शासकीय वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी कोरपना ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये २० ऑक्सिजन बेड आणि गडचांदूर ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटरमध्ये १५ ऑक्सिजन बेड तातडीने वाढविण्याची मागणी माजी आमदार ॲड.वामनराव चटप, प्रभाकर दिवे, अरुण नवले, ॲड.श्रीनिवास मुसळे, नीळकंठ कोरांगे, प्रा.ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरांजने, बंडू राजूरकर, अविनाश मुसळे, संध्या सोयाम, रमाकांत मालेकर, विलास धांडे, प्रवीण सावकार गुंडावार, संतोष पटकोटवार, मुमताज अली, प्रवीण एकरे, पं.स.सदस्य सविता काळे, नगरसेवक सुभाष तुराणकर, संजय येरमे, रवी गोखरे, मदन सातपुते, आशिष मुसळे, पद्माकर मोहितकर, अनंता गोडे, सत्यवान आत्राम, मारोतराव काकडे, देवाजी पाटील हुलके, प्रभाकर लोडे आदींनी केली आहे.

Web Title: Lack of oxygen beds at Gadchandur and Korpana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.