सिंदेवाही तालुक्यात स्वच्छतेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:55+5:302020-12-29T04:27:55+5:30
सन २००९ ते २०१० पासून राज्यात गाव स्वच्छता मोहिमेतंर्गत अनेक गावे हागणदारीमुक्त करून पारितोषिक बहाल करण्यात आले. त्यासाठी प्रशासनाकडून ...
सन २००९ ते २०१० पासून राज्यात गाव स्वच्छता मोहिमेतंर्गत अनेक गावे हागणदारीमुक्त करून पारितोषिक बहाल करण्यात आले. त्यासाठी प्रशासनाकडून योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. हागणदारी मुक्त झालेल्या गावात प्रत्यक्ष फेरफटका मारला असता स्वच्छ भारत मोहिमेकडे दुर्लक्ष होऊन हागणदारी मुक्त मोहिमेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने गाव कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष होणे सहाजिकच आहे. परंतु, प्रशासनाच्या शासकीय अधिकाऱ्यांचे या योजनेकडे दुर्लक्ष होणे चुकीचे आहे. हागणदारी मुक्त अनुदान गावाच्या स्वच्छतेकडे देखभाल व इतर विकास कामावर खर्च होणे गरजेची असताना एखादा पारितोषिक मिळाली की, पुन्हा योजनेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होते. घरोघरी स्वच्छालय असताना अनेक नागरिक गावातून निघणाऱ्या रोडच्या बाजूला उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र दिसून येते. अशाविरोधात कारवाई करणे गरजेचे आहे.