लाखो गुरुदेव भक्तांनी घेतले तपोभूमीचे दर्शन
By admin | Published: January 5, 2015 11:00 PM2015-01-05T23:00:26+5:302015-01-05T23:00:26+5:30
दरवर्षी गोंदोडा गुंफा यात्रेला गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपश्चर्येने गोंदोडा ही भूमी पावन झाली आहे. या भूमीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील
चिमूर : दरवर्षी गोंदोडा गुंफा यात्रेला गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपश्चर्येने गोंदोडा ही भूमी पावन झाली आहे. या भूमीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व गुरुदेव भक्त ५ जानेवारीला आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून राष्ट्रसंताच्या तपोभूमीचे दर्शन घेतात. परंतु, या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस येणार अशी माहिती मिळाल्यामुळे असंख्य गुरुदेव भक्तांनी तपोभूमीत उपस्थिती दर्शविली.
राष्ट्रसंताना भारतरत्न पुरस्कार मिळणार अशी आशा बाळगुण आपल्या लहान मुलांसह बैलबंडी, पायदड तथा वेगवेगळ्या साधनांनी या तपोभूमीत भक्त उपस्थित झाले. परंतु, राज्याचा एकही मंत्री न आल्यामुळे गुरुदेव भक्त तीव्र नाराज झाले. गुरुदेव भक्तांनी अद्यापही आशा सोडलेली नाही. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी राष्ट्रसंताना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन देऊन त्यांनी चिमूर व गोंदोडा परिसरात अनेक ठिकाणी फलक लावले. त्यामुळे गुरुदेव भक्तांना आमदाराकंडून आशा आहे.
अवघ्या लहान वयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गोंदोडा या जंगल परिसरात तपश्चर्या केली. नेरी परिसरात अनेक गुरुदेव भक्तांना एकत्रीत करुन ग्रामपंचायत नेरी चे उद्घाटन केले.
त्यांनी आपल्या काळात आरोग्यसेवा दिली. गोंदोडा परिसरात तालुक्यातील गुरुदेव भक्तांना एकत्रीत आणून एक मोठी यात्रा भरविली. त्या यात्रेत तुकडोजी महाराजांनी सर्वांना सर्वधर्म समभावचा संदेश दिला. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी ‘झाड झडूली शस्त्र बनेंग,े भक्त बनेगी सेना. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नान लगेगी किनारे’ असा मंत्र देत देशाला स्वातंत्र मिळवून दिले. सर्वात प्रथम देशामध्ये चिमूर हे गाव स्वतंत्र झाले. परंतु त्याच व्यक्तीचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी समोर येत नाही. राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, ते चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.
तसेच ज्यांनी राष्ट्रसंताना भारतरत्न मिळावा याचा पाठपुरावा केला ते जिल्ह्याचे पालकमंत्री असून राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे गुरुदेव भक्तांना यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे तपोभूमीमध्ये दर्शन घेण्यासाठी व राष्ट्रसंताना भारतरत्न मिळावा म्हणून गावागावातील लहानांपासून ते वृद्धापर्यंत संपूर्ण भक्त पायदळ, बैलबंडी, तपोभूमीत पोहचले. परंतु एकही मंत्री न आल्यामुळे त्यांची निराशा झाली. (तालुका प्रतिनिधी)