निकृष्ट बांधकामामुळे तलाव आटले

By admin | Published: May 8, 2017 12:36 AM2017-05-08T00:36:25+5:302017-05-08T00:36:25+5:30

जीवती तालुक्यात टेकामांडवा येथे बांधण्यात आलेल्या साठवण तलावाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघडकीस आले आहे.

The lake comes due to poor construction | निकृष्ट बांधकामामुळे तलाव आटले

निकृष्ट बांधकामामुळे तलाव आटले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
टेकामांडवा : जीवती तालुक्यात टेकामांडवा येथे बांधण्यात आलेल्या साठवण तलावाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघडकीस आले आहे. या निकृष्ट कामामुळे तलावातील सर्व पाणी पाझरले जावून तलाव आताच कोरडे पडत असल्याचे दिसून येत आहे. तलावातून सोडण्यात आलेल्या सांडव्यात मातीऐवजी मोठे दगड भरल्यामुळे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे तलाव लवकरच कोरडे पडत आहे. परिणामी यावर अवलंबून असणारे शेतकरी तसेच मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाणी आटल्याने तलावातील मासे मृत्यूमुखी पडले आहे. संबंधित विभागाने पाहणी करुन उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.

Web Title: The lake comes due to poor construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.