नारंडा येथे तलाव खोलीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:28 AM2021-05-12T04:28:44+5:302021-05-12T04:28:44+5:30
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सरपंच अनुताई ताजने होत्या. अध्यक्षस्थानी दालमिया भारत फाउण्डेशनचे सीएसआर प्रमुख प्रशांत भीमनवार होते. प्रमुख पाहुणे ...
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सरपंच अनुताई ताजने होत्या. अध्यक्षस्थानी दालमिया भारत फाउण्डेशनचे सीएसआर प्रमुख प्रशांत भीमनवार होते. प्रमुख पाहुणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळा पाटील पावडे, माजी सरपंच वसंता ताजने, पोलीस पाटील नरेश परसुटकर, देवगडे यांची उपस्थिती होती.
नारंडा येथे एकूण तीन तलाव असून, यापूर्वी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत एका लघुसिंचाई तलावाचे खोलीकरण व एका वनतलावाची निर्मिती करण्यात आलेली होती. परंतु, भवानी माता मंदिराजवळील गावतलावाचे खोलीकरण करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे सदर तलाव खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे, रंजना शेंडे, रूपाली उरकुडे, शालिनी हेपट, अनिल मालेकर, संदीप गंगमवार, मारोती शेंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी सत्यवान चामाटे, अजय तिखट, गौरव वांढरे, मंगल खाडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन प्रवीण हेपट व आभारप्रदर्शन अरविंद खाडे यांनी केले.