रामाळा तलाव सांडपाण्यामुळे प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:35 AM2021-02-25T04:35:17+5:302021-02-25T04:35:17+5:30

चंद्रपूर : येथील रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. दरम्यान, रामाळा तलाव शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित असल्याचे ...

Lake Ramala polluted by sewage | रामाळा तलाव सांडपाण्यामुळे प्रदूषित

रामाळा तलाव सांडपाण्यामुळे प्रदूषित

Next

चंद्रपूर : येथील रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. दरम्यान, रामाळा तलाव शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले असून तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहे. विशेष म्हणजे, घरगुती सांडपाणी वाहून नेणारे बंदिस्त गटार नालीचे जाळे पूर्णपणे अस्तित्वात नाही. त्यामुळे काही प्रमाणात अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी तलावामध्ये, लगतच्या नदीमध्ये जाते व उर्वरित अप्रक्रियाकृत घरगुती सांडपाणी जमिनीमध्ये मुरून भूजलसुद्धा प्रदूषित होत असल्याचेही म्हटले आहे. ऐतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण करून सौंदर्यीकरण करण्याच्या मागणीला घेऊन इको-प्रोच्यावतीने अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. यासंदर्भात इको- प्रोच्या निवेदनाची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला सूचना दिल्या आहेत.

रामाळा तलावाच्या खोलीकरण तसेच सौंदर्यीकरणाबाबत वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आहे. बैठकीदरम्यान घरगुती सांडपाणी नाल्याद्वारे तलावामध्ये जाते. तसेच तलाव भरल्यानंतर अतिरिक्त पाणी ओसंडून लगतच्या झरपट नदीमध्ये मिसळते. झरपट नदी पुढे वाहून इरई नदीत मिसळते, असे स्पष्ट दिसून आले.

राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्लीच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी शहरातून निर्मित १०० टक्के घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता प्रक्रिया सयंत्रणा उभारणे, शहरामध्ये बंदिस्त गटार नालीचे बांधकाम करणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत चंद्रपूर महानगरपालिकेकडे शहरामधील निर्मित घरगुती सांडपाणी वाहून नेणाऱ्या बंदिस्त गटार नालीचे जाळे पूर्णपणे अस्तित्वात नाही. त्यामुळे ऐतिहासिक रामाळा तलावात येणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होत आहे.

कोट

भूगर्भातील पाणीसुद्धा प्रदूषित होत आहे, हे स्पष्ट आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक नागरिक मंडपात येऊन तक्रार करीत आहे. तलावातील आणि परिसरातील भूजल प्रदूषित होऊन सुद्धा नगर व जिल्हा प्रशासन गंभीर दिसून येत नाही, याकडे नागरिकांनी आता भूमिका घेणे आवश्यक आहे.

- बंडू धोतरे

अध्यक्ष, इको- प्रो.

Web Title: Lake Ramala polluted by sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.