कोलगाव-विसापूर पूलासाठी भूसंपादन प्रक्रिया २३ डिसेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:52 AM2020-12-17T04:52:33+5:302020-12-17T04:52:33+5:30
विसापूर : वर्धा नदीच्या कोलगाव-विसापूर घाटावर प्रस्तावित पुलासाठी भूसंपादन प्रक्रियेला २३ डिसेंबर पासून सुरूवात होत आहे. दोन्ही बाजूने साडेतीन ...
विसापूर : वर्धा नदीच्या कोलगाव-विसापूर घाटावर प्रस्तावित पुलासाठी भूसंपादन प्रक्रियेला २३ डिसेंबर पासून सुरूवात होत आहे.
दोन्ही बाजूने साडेतीन किमीचा सिमेंट काँक्रीट पोच मार्ग निर्मितीसाठी भूमी अधिग्रहित करण्यात येणार आहे. कोलगाव परिसरातील जागा शासकीय आहे व विसापूर परिसरातील जवळपास २८२०५१.५ चौ.मी जागा शेतकऱ्यांची खासगी मालमत्ता असल्याने ती अधिग्रहित करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूरकडून भूसंपादन प्रक्रियेत आखणी करण्यात आलेल्या ४१ भूधारक शेतकऱ्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहे. प्रकल्पाच्या आखणीमध्ये समाविष्ट जमिनीचा तपशील सादर करण्याबाबत तसेच सीमांकन करताना प्रत्यक्ष भूधारकाने जमिनीचा सातबारा उतारे व नकाशे सोबत ठेवावे व व्यक्तिशः उपस्थित रहावे, असे या नोटीसात म्हटले आहे. दरम्यान नोटीसमधील काही भूधारक शेतकऱ्यांनी पूर्वीच आपली शेती विक्री केली व नावात फेरफार झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यादीमध्ये पूर्वीच्या भू-धारकाचे नाव आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करून भूसंपादन करावे, अशी मागणी प्रकल्पात आखणीमध्ये समाविष्ट शेतकऱ्यांनी केली आहे.