जमीन आरोग्य पत्रिका-शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:23 AM2020-12-25T04:23:04+5:302020-12-25T04:23:04+5:30
तालुका कृषी अधिकारी प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी, शेगांव बु.अंतर्गत पारडी येथील मृदा पत्रिका वर आधारित हरभरा ...
तालुका कृषी अधिकारी प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी, शेगांव बु.अंतर्गत पारडी येथील मृदा पत्रिका वर आधारित हरभरा पीक प्रात्यक्षिक लाभार्थी सुधाकर जुनघरे यांच्या शेतात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कृषी विस्तार अधिकारी विजय खिरटकर यांनी माती नमुना घेणे ,जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना,एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. व्ही. पी. काळे, मंडळ कृषी अधिकारी हरभरा पीक -नवीन लागवड तंत्रज्ञान, बी बी एफ वर लागवड,खत ,पाणी व फवारणी व्यवस्थापन,तूर पीक लागवड व तूर पिकावरील फवारणी व्यवस्थापन इ. विषयावर मार्गदर्शन केले. कृषी सहायक ढिसले यांनी कापूस फरदड निर्मूलन, सोयाबीन ग्रामबीजोत्पादन व जमीन आरोग्य पत्रिकेबाबत माहिती दिली. संचालनगणेश चुनडे यांनी केले. कार्यक्रमाला ४५ शेतकरी उपस्थित होते.