ेटॉवरच्या जमिनीचा मोबदला मिळणार

By admin | Published: November 11, 2016 01:04 AM2016-11-11T01:04:37+5:302016-11-11T01:04:37+5:30

शेतकऱ्यांच्या शेतात मोठ-मोठी टॉवर्स उभे केले जात असल्यामुळे जवळपास सहा गुंठे जमीन कायमस्वरूपी वाया जाते.

The land of Ketone will be paid | ेटॉवरच्या जमिनीचा मोबदला मिळणार

ेटॉवरच्या जमिनीचा मोबदला मिळणार

Next

खांबाला २ लाख ५० हजार देण्याची मागणी
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या शेतात मोठ-मोठी टॉवर्स उभे केले जात असल्यामुळे जवळपास सहा गुंठे जमीन कायमस्वरूपी वाया जाते. काम करताना जवळपास ८ ते १० गुंठे जमिनीवरील पिकांचे नुकसान होते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पूर्ण टॉवर आल्यास त्याला १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावीे, अशी मागणी २०१४ पासून टॉवर विरोधी कृती समितीने वेळोवेली शासनाकडे केली होती. ती मागणी आता मान्य झाली आहे.
राज्यात सन २०१० नंतर ४०० के.व्ही. पुढील कामे सुरू झाली. राज्यात प्रामुख्याने १४ जिल्ह्यात ही कामे सुरू आहेत. विद्युत लाईनची कामे करताना टॉवर विरोधी कृती समितीच्या प्रचंड दबावामुळे व पाठपुराव्यामुळे आता शासन निर्णय १ नोव्हेंबर २०१० नुसार, शेतकऱ्यांना टॉवरखाली येणाऱ्या जमिनीचा मोबदला बाजारभावानुसार देण्यात येणार आहे. संबंधित ठिकाणचे बाजारमूल्य गृहीत धरताना कोरडवाहू, बागायत, फळबागांची जमीन व शहरी भागात तसेच रस्त्यालगत असे वर्गीकरण करण्यात आले आहे. परंतु जमीन अधिग्रहण न करता मोबदला देण्यात येणार आहे. जमिनीचा मोबदला कोरडवाहुला २५ टक्के, बागायतला ५० टक्के, फळबागांना ६० टक्के व रस्त्यालगतच्या जागेला ६५ टक्के असे वर्गीकरण केले असून ते योग्य नाही. सरसकट २० गुंठे जमिनीचे नुकसान गृहीत धरून मोबदला द्यावा यासाठी शासन निर्णयात बदल करावा लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास कमीत कमी ७५० व जास्तीत जास्त १२०० टॉवर्स आलेले आहेत. यामुळे ६ ते ८ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर आले नाही. फक्त तार गेली असेल तर बागायत शेती असल्यास २ लाख रुपये व कोरडवाहू शेती असल्यास १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मंजूर करण्याचा शासनाचा विचार आहे. जर फक्त रस्ता गेला असेल तर १०० फुट लांबी पर्यंत ५० हजार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The land of Ketone will be paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.