Chandrapur | भुस्खलनाचा धोका असलेली घुग्घूसमधील १६० कुटुंबे स्थलांतरित

By राजेश भोजेकर | Published: August 30, 2022 04:37 PM2022-08-30T16:37:16+5:302022-08-30T16:44:20+5:30

घरभाडे व दैनंदिन गरजांसाठी निधी देण्याचे प्रशासनाचे वेकोलिला निर्देश

Landslide at Chandrapur Ghugus area: 112 houses in 65 thousand square meters are extremely dangerous - balu dhanorkar | Chandrapur | भुस्खलनाचा धोका असलेली घुग्घूसमधील १६० कुटुंबे स्थलांतरित

Chandrapur | भुस्खलनाचा धोका असलेली घुग्घूसमधील १६० कुटुंबे स्थलांतरित

googlenewsNext

चंद्रपूर : घुग्घूस येथील अमराई वॉर्डांत २६ ऑगस्ट रोजी भूस्खलन होऊन झाल्याने एक अख्खे घर जमिनीत गेले. या परिसरातील अन्य घरांना अशा प्रकारचा धोका होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन ६७ हजार ५०० वर्गमिटरमधील घरांना धोकादायक भाग म्हणून जाहीर करण्यात आले. यातील १५२ च्या वर घरांपैकी ११२ घरे अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे.

स्थायी स्वरूपात निवाऱ्याची व्यवस्था होईस्तव त्यांना राहण्याकरिता ३ हजार रुपये घरभाडे वेकोलि देणार आहे. ही रक्कम महसूल विभागामार्फत प्रत्येक कुटुंबियांना मिळणार आहे. सोबतच पुढील काही महिन्यात त्यांना स्थायी स्वरूपात राहण्याकरिता जमिनीचे पट्टे व त्यावर घरे बांधण्यासाठी शासन मदत करणार आहे, अशी माहिती खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी दिली.

या संदर्भात वेकोलिच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीला आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, निवासी जिल्हाधिकारी मेश्राम, उपविभागीय अधिकारी घुगे, वेकोलिचे महाप्रबंधक आभाशचंद्र सिंग, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, तहसीलदार गौंड, नगर परिषद मुख्याधिकारी पिदूरकर, डीजीएमएसचे अधिकारी, ठाणेदार बबनराव पुसाटे, शहर अध्यक्ष राजू रेड्डी, किसन जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती सेल पवन अगदारी, सय्यद अन्वर शेख, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी, अलीम शेख यांची उपस्थिती होती.

चंद्रपूरमध्ये अख्खे घर जमिनीत गडप, आणखी ४ घरांना तडे; अपघाताने उडवली एकच खळबळ

घुग्गुस येथील गजानन मडावी यांचे राहते घर झालेल्या भूस्खलनाने जमिनीत गडप झाले. खासदार धानोरकर यांनी घटनेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यानंतर वेकोलीचे महाप्रबंधक अभाशचंद्र सिंग व तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी बाधित जागेचा नकाशा दाखवून पर्यायी व्यवस्थांबाबत चर्चा केली.

इंग्रज काळात ४० वर्ष होती भूमिगत खाण

सन १९०२ ते सन १९४० पर्यंत या भागामध्ये इंग्रजकालीन भूमिगत कोळसा खाण होती. १९५० ते १९८४ पर्यंत देखील भूमिगत खाण होती. नंतर या ठिकाणी खुली खाण सुरु झाली. पूर्वीच्या अंडरग्राउंडच्या दोन गॅलरी जंक्शनमध्ये हा भाग खचला. भविष्यात मोठ्या घटनेची भीती आहे. ही बाब लक्षात या अतिधोकादायक क्षेत्रातील नागरिकांना तत्काळ जमिनीचे पट्टे व घरे बांधण्यासाठी शासकीय मदतची गरज महसूल विभाग व वेकोली व्यवस्थापनाकडे व्यक्त केली. ती तत्काळ देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भुस्खलनात घर गडप झालेल्या कुटुंबाचा निवाऱ्याचा प्रश्नही मार्गी लागला.

बाळू धानोरकर, खासदार, चंद्रपूर.

Web Title: Landslide at Chandrapur Ghugus area: 112 houses in 65 thousand square meters are extremely dangerous - balu dhanorkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.