फ ळधारणेवर आलेल्या पिकांवर अळीचा दंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:23 PM2017-09-20T23:23:31+5:302017-09-20T23:23:44+5:30

शेतकºयांनी दिवस-रात्र काबाडकष्ट करून मोठ्या मेहनतीने पीक उभे केले. उसनवारी व कर्ज काढून शेतीवर अतोनात खर्च केला.

 The larvae on cropped crops | फ ळधारणेवर आलेल्या पिकांवर अळीचा दंश

फ ळधारणेवर आलेल्या पिकांवर अळीचा दंश

googlenewsNext
ठळक मुद्दे शेतकरी हवालदिल : पीक नष्ट होण्याचा धोका

प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : शेतकºयांनी दिवस-रात्र काबाडकष्ट करून मोठ्या मेहनतीने पीक उभे केले. उसनवारी व कर्ज काढून शेतीवर अतोनात खर्च केला. मात्र शेतपिकांवर आता अळीचा दंश व रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक पूर्णत: नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शेती म्हणजे शेतकºयांच्या जिवाची माती, हे ब्रिदवाक्य शेतीची भीषनता दर्शविणारे व शेतकºयांची वास्तविकता मांडणारे आहे. यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासूनच शेतकरी पुरता होरपळून गेला आहे. शेतीतून विक्रमी उत्पादन होईल, असे शेतकºयांना वाटत होते. यासाठी शेतकºयांनी शेतात दिवस-रात्र काबाडकष्ट करून इच्छा मनात नसातानाही पीक उभे केले. मात्र वेळोवेळी निसर्गानेही दगा दिल्याने पिकांची वाढ खुंटली. वेळी अवेळी आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले.
आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकºयांनी कशीबशी शेती केली. मात्र मोठ्या प्रमाणावर शेतपिकांवर रोगाने प्रादुर्भाव केला आहे. शेतात दिवस-रात्र मेहनत करायची व शेवटी हाती काहीच लागायचे नाही, अशी शेतकºयांची बिकट अवस्था झाली आहे. परंतु, शेतीची ही बिकट अवस्था कार्यालयातील टेबलावर शेतीचा हिशेब मांडणाºयांना काय ठावूक. वातानुकूलीत खोलीत मिनरल वॉटर पिऊन आणि कागदी-घोडे नाचवून शेतीचे खरे वास्तव मांडता येत नाही, हे या अधिकाºयांना सांगणार कोण?
शेतकºयांचे अच्छे दिन आणू पाहणारे सरकार आज शेतकºयांचा पाठीशी उभे राहायला तयार नही. निसर्ग साथ देत नाही त्यामुळे शेतीची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. कपाशी, सोयाबीन, धान, पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी पुर्णत: खचून गेला आहे.
शेतीचे अच्छे दिन कधी येणार ?
शेतीचे दिवस आज वाईट आहे. कोरडवाहु शेतीची बिकट अवस्था शब्दात मांडावी तेवढी कमी आहे. शेतीला येत असलेली अवकळा शेतीची अधोगती स्पष्ट करणारी आहे. शेतीचे ‘अच्छे दिन’ येऊन शेतकरी सुखी होणार का, हा खरा प्रश्न आहे.

कपाशी, सोयाबीन, धान पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रार्दुभाव वाढला आहे. फ ळधारणेवर आलेल्या पिकांवर अळीने दंश केल्याने पीक पुर्णत: उध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
- श्रीधर जुनघरी
शेतकरी, गोवरी

Web Title:  The larvae on cropped crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.