आज आणि उद्या मतदार बनण्याची शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:06 PM2019-03-01T23:06:07+5:302019-03-01T23:08:49+5:30

लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. तत्पूर्वी आपला मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदार नोंदणीची शेवटची संधी २ व ३ मार्च रोजी उपलब्ध आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मताधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी. नसेल तर लगेच ६ क्रमांकाचा अर्ज करून मतदार व्हावे, ही शेवटची संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

The last chance to become voters today and tomorrow | आज आणि उद्या मतदार बनण्याची शेवटची संधी

आज आणि उद्या मतदार बनण्याची शेवटची संधी

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ंसर्व महाविद्यालयात अर्ज उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. तत्पूर्वी आपला मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदार नोंदणीची शेवटची संधी २ व ३ मार्च रोजी उपलब्ध आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मताधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी. नसेल तर लगेच ६ क्रमांकाचा अर्ज करून मतदार व्हावे, ही शेवटची संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात जारी केलेल्या सूचनेनुसार संपूर्ण देशभर मतदार नोंदणी शेवटच्या टप्प्यात असून याचा फायदा उद्या व परवा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: नवमतदारांनी ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्या सर्वांनी या मोहिमेचा फायदा घ्यावा. फक्त आधार कार्ड व आपले रहिवासी ओळखपत्र व एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन फॉर्म नंबर ६ भरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाईन पद्धतीनेदेखील मतदारांना आपल्या नावाची नोंदणी करता येते. तसेच २ मार्चला जिल्ह्यामध्ये सर्व मतदान केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याबाबत सूचना करण्यात आली असून उद्या व परवा कॉलेजमध्येदेखील मतदान नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
मतदार यादीमधील नाव तपासणे, चंद्रपूरमध्ये दीर्घ कालावधीपासून रहिवासी असणाऱ्यांनी या जिल्ह्यांमध्ये आपल्या नावाची नोंदणी करणे व अन्य त्यांच्या कोणत्याही अडचणी संदर्भात नागरिकांनी जवळच्या मतदान केंद्रावर भेट देऊन आपली अडचण दूर करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेला उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे उपस्थित होते.
यावेळी इव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅट यंत्रणेच्या मार्फत मतदान किती सुलभ, सहज व पारदर्शी झाले आहे, याचे पत्रकारांसमक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

Web Title: The last chance to become voters today and tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.