अखेरच्या दिवशी १४२ नामांकन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 09:55 PM2018-11-20T21:55:53+5:302018-11-20T21:56:09+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या वाढीव कार्यक्रमानुसार मंगळवार दिवस नामांकन दाखल करण्यातसाठी अंतिम दिवस म्हणून ठरला होता. आज अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १० तर नगरसेवक पदासाठी १३२ नामांकन दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : राज्य निवडणूक आयोगाच्या वाढीव कार्यक्रमानुसार मंगळवार दिवस नामांकन दाखल करण्यातसाठी अंतिम दिवस म्हणून ठरला होता. आज अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १० तर नगरसेवक पदासाठी १३२ नामांकन दाखल झाले आहेत.
ब्रम्हपुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याप्रमाणे १२ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर असा होता. परंतु आॅनलाइन उमेदवारी सादर करण्यामध्ये होणारी तारांबळ लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने एक दिवसाची मुदत वाढवून २० नोव्हेंबरपर्यंत केली होती. मंगळवारी शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १० उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. त्यात काँग्रेसकडून रिता दीपक उराडे, भाजपाकडून यास्मिन बहादूर लाखानी, विदर्भ माझा पार्टीतर्फे अर्पिता अनिल दोनाडकर, बहुजन समाज पार्टीकडून सुचिता सेनापती चांदेकर, भारिप बहुजन महासंघाकडून उमा किशोर हजारे, शिवसेनेकडून बबली विनायक दर्यापूरकर तर अपक्षांमध्ये रश्मी कैलास पेशने, मीनाक्षी रामकृष्ण चौधरी, पूनम खेमचंद नंदेश्वर व संध्या सतेंद्र सोनटक्के इत्यादींचा समावेश आहे तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ (अ)- चार नामांकन, (ब)-चार नामांकन, प्रभाग क्रमांक २ (अ)-चार, (ब)- पाच, प्रभाग क्रमांक (अ)- तीन, (ब) नऊ, प्रभाग क्रमांक ४ (अ)-तीन (ब)-पाच, प्रभाग क्रमांक ५ (अ)-नऊ, (ब)- सात, प्रभाग क्रमांक ६ (अ)- आठ, (ब)- सहा, प्रभाग क्रमांक ७ (अ)- आठ, (ब)-दहा, प्रभाग क्रमांक ८ (अ)- पाच, (ब)- दहा, प्रभाग क्रमांक ९ (अ)-तीन, (ब)- आठ, प्रभाग क्रमांक १० (अ)- चार, (ब)-पाच, अशा एकूण १३२ प्रभागनिहाय उमेदवारी नामांकन दाखल केले आहे. यामध्ये एका उमेदवारांनी एकापेक्षा जास्त नामांकन दाखल केल्याने संखेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. छानणीनंतर प्रभागनिहाय अंतिम उमेदवार यादी निश्चित होणार आहे.