पाच दिवसात विविध विभागांकडून १८ लाख वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:02 AM2019-07-07T00:02:52+5:302019-07-07T00:04:04+5:30

तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याचे अर्थ,नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या संकल्पातंर्गत २०१९ पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते आनंदवन येथे उत्साहात पार पडला.

In the last five days, 18 lakh plantations have been planted by various departments | पाच दिवसात विविध विभागांकडून १८ लाख वृक्षांची लागवड

पाच दिवसात विविध विभागांकडून १८ लाख वृक्षांची लागवड

Next
ठळक मुद्देमोहीम सुरूच। ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत संस्था, संघटनांचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याचे अर्थ,नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या संकल्पातंर्गत २०१९ पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते आनंदवन येथे उत्साहात पार पडला. मोहिमेच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यात १७ लाख ५ हजार ८९८ तर संपूर्ण राज्यात २ कोटी ३२ लाख ८९ हजार ६१ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
‘५० कोटी वृक्षलागवड’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेला यशस्वी करण्यासाठी राज्यात ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम सुरू झाली आहे. जिल्ह्यात १ जुलैला पहिल्याच दिवशी २ लाख ११ हजार ८०२ झाडे, दुसऱ्या दिवशी २ जुलै रोजी २ लाख ३९ हजार १९६ झाडे लावण्यात आली. ३ जुलैला २ लाख ८१ हजार ८४४ तर ४ जुलैला ३ लाख ६० हजार ४७० झाडे लावण्यात आली.
या मोहिमेच्या पाचव्या दिवशी ६ लाख १२ हजार ५८६ झाडे लावण्यात आली आहे. मानवाने निसर्गाकडून फक्त घेण्याचेच काम केले आहे. आता वेळ आहे निसर्गाला परतफेड करण्याची. त्यामुळे शासनाच्या विविध विभागांसोबतच सर्वसामान्य नागरिक, विविध संस्था व संघटनांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग व्हावे, असे आवाहन चंद्रपूर वनवृत्त व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

घुग्घुस शहरात दीड हजार वृक्ष लागवड
घुग्घुस : शहरात दीड हजार वृक्ष लागवड करण्यात आले. पहिल्या दिवशी वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, घुग्गुसचे सरपंच, वेकोलिचे उपमहाप्रबंधक व ठाणेदार उपस्थित होते. शहरातील नागरिकांनी वृक्षदिंडी व स्वच्छता रॅलीचे जल्लोषात स्वागत केले. श्री गुरूदेव सेवा मंडळ, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून वृक्षारोपणाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले. वृक्षदिंडीच्या दुसºया दिवशी चंद्रपूर तालुक्यातील घग्गुस, मोरवा या गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. भद्रावती तालुक्यातील मासळ व माजरी येथे दिंडी पोहोचताच गावकऱ्यांनी स्वागत केले.

Web Title: In the last five days, 18 lakh plantations have been planted by various departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.