सामुदायिक औषधोपचार मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:43+5:302021-07-02T04:19:43+5:30
बल्लारपूर : महाराष्ट्र शासनातर्फे १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत एक दिवसीय सामुदायिक औषध उपचार मोहीम बल्लारपूर तालुक्यात ...
बल्लारपूर : महाराष्ट्र शासनातर्फे १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत एक दिवसीय सामुदायिक औषध उपचार मोहीम बल्लारपूर तालुक्यात राबविण्यात येत असून या औषधीचा लाभ घेणारे लाभार्थी बल्लारपूर शहरात ४३ हजार ५९ तर ग्रामीण विभागात ८२ हजार ९२० आहेत. असे एकूण एक लाख २५ हजार ९७९ पात्र लाभार्थी आहेत.
ही सामुदायिक उपचार मोहीम घरोघरी जाऊन राबविण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील ३२ गावात ९ हजार २३७ घरांना भेटी देऊन ४३ हजार ५९ पात्र लाभार्थ्यांना गोळ्यांची मात्रा खाऊ घालण्याकरिता आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका यांचे ८० मनुष्यबळ पथक तयार करण्यात आले तर बल्लारपुरातील ३२ वॉर्डांतील १७ हजार ४४६ घरांना भेटी देऊन ८२ हजार ९२० पात्र लाभार्थ्यांना गोळ्या खाऊ घालण्याकरिता ३६० मनुष्यबळ चमू काम करणार आहे. या मोहिमेत ३२ गावात एकूण १ लाख १५ हजार २४८ आयवरमेटीनच्या गोळ्या खाऊ घालण्यात येतील तर बल्लारपुरात २ लाख ७ हजार ३०० गोळ्यांचे वाटप करण्यात येईल. या मोहिमेला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन मेश्राम यांनी केले आहे.