सिंदेवाही तालुक्यात दुग्ध व्यवसायाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:20 PM2017-10-29T23:20:24+5:302017-10-29T23:20:42+5:30
शेतकºयांनी आपल्या शेतावर पिकणाºया मालावर आधारित उद्योग सुरु करणे काळाची गरज आहे.
बाबुराव परसावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : शेतकºयांनी आपल्या शेतावर पिकणाºया मालावर आधारित उद्योग सुरु करणे काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता सिंदेवाही येथील सुनील व अनिल उट्टलवार बंधूंनी सिंदेवाही येथे दूध डेअरी प्रकल्प सुरु करुन सिंदेवाही व तालुक्यातील शेतकºयांना दुग्ध व्यवसाय सुरु करण्याचा संदेश दिला आहे. यासोबतच बेरोजगारांसमोरही एक आदर्श ठेवला आहे.
सिंदेवाही परिसरात दुधाची टंचाई लक्षात घेवून उट्टलवार बंधंूनी सिंदेवाहीत मदर डेअरी प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता त्यांनी मुर्रा जातीच्या १४ म्हशी व साहिवाल जातीच्या चार गायी विकत घेतल्या. या म्हशी व गायीपासून रोज १२० लिटर दुधाचे उत्पादन होते. उत्पादित झालेले दूध ते मदर डेअरीला देतात. दुधात गुणवत्ता असल्याने उत्पादित केलेल्या दुधाला ४० ते ५० रुपये लिटर भाव मिळत आहे. त्यांनी सिंदेवाही येथे मदर डेअरीचे संकलन केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे शेतकºयांनी आणलेले दूध मदर डेअरी केंद्रात जमा केले जाते. दुध संकलन केंद्रावर शितकरण करण्याचे यंत्र आहे. म्हशीच्या देखभालीसाठी त्यांनी नियमित तीन मजूर ठेवले आहेत. प्रत्येकाला त्यांनी कामे वाटून दिली आहेत. दुध उत्पादक वैरणासाठी त्यांनी आपल्या शेतात डिएचएन- ६ यशवंत जयवंत गवत व मालदांडी ज्वारीची दोन एकरमध्ये लागवड केली आहे. ते तणसाचे वापर फार कमी प्रमाणात करतात. ते नेहमी कुटार आणि गव्हांडाचा वापर करतात. मजूर, गुराचे खाद्य आणि औषधी याचा खर्च वजा जाता महिन्याकाठी त्यांना साधारणत: ४० ते ५० हजार रुपयांचा फायदा होत आहे. उट्टलवार यांना आता पशुधनाचा अभ्यास झाला आहे. पशुधनावर सर्वसाधारण आजार उद्भवल्यास ते स्वत:च त्यांच्यावर उपचार करतात. मात्र गंभीर आजार दिसून आल्यास ते येथील पशु डॉक्टरकडे घेवून जातात. सिंदेवाही तालुक्यातील शेतकºयांना दुधाच्या विक्रीसाठी प्रत्येक दहा- पंधरा किलोमीटरवर मदर डेअरीच्या माध्यमातून राजोली, इटोली, वासेरा, वाकल, नवरगाव, पळसगाव, तळोधी आदी गावावरुन दुध सिंदेवाही येथे मदर डेअरी केंद्रावर आणले जात आहे. दररोज ७०० लिटर दूध संकलन केंद्रावर जमा होते. त्यामुळे दुधाला चांगले भाव मिळू लागले आहे. या योजनेअंतर्गत ३५० ते ४०० शेतकरी सहभागी झाले आहेत. सिंदेवाही तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांनी शेत मालावर आधारित उद्योग सुरु करुन तालुक्यातील युवकांनी पूरक उद्योग व्यवसाय केल्यास बेरोजगारीवर मात करता येईल. सिंदेवाही व तालुक्यातील पशुधन दिवसेंदिवस कमी होत असल्याने शासनाने शेतकºयांना गाय व म्हशीचे वाटप करुन प्रोत्साहन द्यावे, असे मत सुनील उट्टलवार यांनी व्यक्त केले.