शिक्षकांच्या हातून विकासाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:58+5:302021-09-07T04:33:58+5:30
चंद्रपूर : प्रत्येकांच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व आहे. शिक्षक हा समाजशील असतो.त्यांची व्याप्ती मोठी असते. त्यामुळे प्रत्येक जण शिक्षकांचा ...
चंद्रपूर : प्रत्येकांच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व आहे. शिक्षक हा समाजशील असतो.त्यांची व्याप्ती मोठी असते. त्यामुळे प्रत्येक जण शिक्षकांचा आदर करतो. यामुळेच येथील महेशनगर येथील विकास कामांचा शुभारंभ शिक्षकांच्या हातून करीत अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
महेशनगर येथे नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्या निधीतील विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक व जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य जे. डी. पोटे,ज्ञानोदय अकॅडमी कॉन्व्हेंटच्या प्राचार्य प्रज्ञा बोरगमवार, चोराळा शाळेतील शिक्षक बोडखे यांच्यासह वाॅर्डातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका माया उईके, माजी नगरसेविका माया मांदाळे, शांताबाई डांगे,गंगाधर पिदुरकर, रत्नमाला नरड, भरत डांगे, उपसरपंच सुरेश तराळे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांचा ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव विश्वनाथ तामगाडगे यांच्या हस्ते तर जे. डी. पोटे, प्रज्ञा बोरगमवार आणि बोडके या शिक्षकांचा सुभाष कासनगोट्टुवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जे.डी.पोटे, आभार भरत डांगे यांनी मानले. आयोजनाकरिता सुषमा डांगे, रवी नरड, शंकर गेडेकर, तुळशिराम नरड, दयाराम उराडे, जगन्नाथ गुरनुले, प्रभाकर देठेकर,राजू तिवारी, वामन मंदे, रत्नमाला नरड, संध्या सहस्त्रबुद्धे, सुरेखा लडके आदींनी सहकार्य केले.