जागतिक आरोग्यदिनी नवीन लसीकरण केंद्राला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:28 AM2021-04-08T04:28:43+5:302021-04-08T04:28:43+5:30

चंद्रपूर : जागतिक आरोग्यदिनाच्या अनुषंगाने महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते नवीन लसीकरण केंद्राचा वडगाव प्रभागातील गजानन मंदिर ...

Launch of new vaccination center on World Health Day | जागतिक आरोग्यदिनी नवीन लसीकरण केंद्राला सुरुवात

जागतिक आरोग्यदिनी नवीन लसीकरण केंद्राला सुरुवात

Next

चंद्रपूर : जागतिक आरोग्यदिनाच्या अनुषंगाने महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते नवीन लसीकरण केंद्राचा वडगाव प्रभागातील गजानन मंदिर येथे प्रारंभ करण्यात आला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनपा सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर लसीकरण केंद्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वडगाव प्रभागातील लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली. शासकीय व खासगी लसीकरण केंद्र मिळून एकूण २८ हजार २६९ नागरिकांचे लसीकरण चंद्रपूर शहरात करण्यात आले. शहरात १६ जानेवारीपासून सात केंद्रांवर दररोज सातशे जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केले. त्यानंतर एक-एक केंद्रांची वाढ करून एकूण १४ केंद्रांद्वारे १ हजार ४०० लसीकरण दरदिवशी केले जाणार आहे.

याप्रसंगी महापौर राखी संजय कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक देवानंद वाढई, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे. डॉ. अश्विनी भारत उपस्थित होते.

बाॅक्स

शासकीय लसीकरण केंद्र

रामचंद्र प्रायमरी शाळा रामनगर, रवींद्रनाथ टागोर शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड, मातोश्री शाळा, तुकूम, पोलीस हॉस्पिटल शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.१, इंदिरानगर मूल रोड, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ५ नेताजी चौक बाबुपेठ, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ६ सुपरमार्केट भिवापूर, गजानन मंदिर वडगाव या ८ ठिकाणी शासकीय लसीकरण केंद्र आहेत.

बाॅक्स

खासगी लसीकरण केंद्र

संजीवनी हॉस्पिटल, क्राईस्ट हॉस्पिटल, बुक्कावार हॉस्पिटल, वासाडे हॉस्पिटल, मुसळे हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पिटल या ६ ठिकाणी खासगी लसीकरण केंद्र सुरू आहेत.

बाक्स

नवीन सुरू होणारी शासकीय लसीकरण केंद्र

डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, भानापेठ, नागरी उपजीविका अभियान जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागे हॉस्पिटल वॉर्ड, मुरलीधर बागला कॉन्व्हेंट महाकाली वॉर्ड, बजाज तंत्रनिकेतन महाविद्यालय एकोरी वॉर्ड, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह - समता चौक बाबुपेठ, कर्मवीर कन्नमवार प्राथमिक शाळा, सरकारनगर, पोद्दार कॉन्व्हेंट स्कूल, अष्टभुजा वॉर्ड रमानगर.

Web Title: Launch of new vaccination center on World Health Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.