रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:30 AM2021-08-27T04:30:42+5:302021-08-27T04:30:42+5:30
चंद्रपूर: शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून ...
चंद्रपूर: शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नागरिकानी रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, यासाठी इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. गांधी चौक येथे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शेजारील ऑटो स्टॅन्ड येथे महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी देऊन या मोहिमेचा शुभारंभ केला.
२६ ऑगस्टपासून शहरात ठिकठिकाणी फलक लावून इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्व आणि पावसाचे पाणी वाचवा बॅनर लावण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्ष साधना उपगन्लावार, सचिव राखी बोराडे, रामनगर प्रभागातील नगरसेविका, प्रकल्प संचालक वंदना तिखे, हिमानी गोयल, सरोज धवस, वसुधा बोडखे, छाया दुधलकर, मीनाक्षी उपगन्लावार, वैशाली मद्दीवार यांच्यासह सभासद महिलांची उपस्थिती होती. शहरातील अधिकाधिक घरे, इमारतींमधे रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविण्याच्या दृष्टीने नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले.