विधी सेवा दिवस कार्यक्रमाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:08 AM2017-11-11T00:08:39+5:302017-11-11T00:08:56+5:30

जिल्हा न्यायालय अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये विधी सेवा दिवसाचे गुरूवारी आयोजन करुन शुभारंभ करण्यात आला.

Launch of Rituals Service Day Program | विधी सेवा दिवस कार्यक्रमाचा शुभारंभ

विधी सेवा दिवस कार्यक्रमाचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देजनजागृतीपर रॅली : नागरिकांना दिली विधीविषयक माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा न्यायालय अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये विधी सेवा दिवसाचे गुरूवारी आयोजन करुन शुभारंभ करण्यात आला.
चंद्रपूर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष नितीन बोरकर यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश बोरकर यांनी या विधी सेवा दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेवून सामान्य जनतेला विधी सेवा प्राधिकरणातर्फे मोफत उपलब्ध असलेल्या विविध सल्ला व सहाय्य बाबतची माहिती यावेळी त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचा लाभ चंद्रपूर जिल्हयातील सर्वसामान्य नागरिकांना घेता येणार आहे. यावेळी विधी सेवा दिवसाचे महत्व सामान्य नागरिकांना कळावी, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये अधिकारी, कर्मचारी, नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी जिल्हा सत्र न्यायालयाच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Launch of Rituals Service Day Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.