गुरुवारी संकल्प सिद्धीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:49 PM2017-08-30T23:49:22+5:302017-08-30T23:49:45+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०१७ ते २०२२ पर्यंत साकार होवू घातलेल्या व केंद्र सरकारच्या सुचनेस अनुसरून संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेल्या संकल्प.....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०१७ ते २०२२ पर्यंत साकार होवू घातलेल्या व केंद्र सरकारच्या सुचनेस अनुसरून संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेल्या संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमाचा शुभारंभ ३१ संप्टेंबर गुरूवारी दाताळा रोड, चंद्रपूर येथील साईराम सभागृहात डॉ. पंजबराव देशमुख कृषि विद्यापीठ, आकोला अंतर्गत जिल्हा परिषद, कृषि विज्ञान केंद्र, आत्मा, कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात होत आहे.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनानुषंगाने केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरीष्ठ अधिकाºयांची बैठक घेवून या बैठकीत केंद्र सरकारच्या संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमाच्या अयोजनामागील पार्श्वभुमी विषद केली. यावेळी ना. अहीर यांनी अधिकाºयांना केंद्र सरकार द्वारा पुरस्कृत या कार्यक्रमाच्या संकल्प पुर्ततेकरिता उपस्थितांना आवश्यक सुचना केल्या. या बैठकीस आ.नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, जि.प.चे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, कृषि विज्ञान केंद्राचे प्रणिता धुमाळ, आत्माचे मगर, कृषि विभागाचे कृषि उपअधिक्षक चवले यांचेसह अनेक विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्र्यांचा सूचनेनुसार केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकार पुरस्कृत विधि विकास योजनाबरोबरच कृषि सिंचन, विद्यूत, वैयक्तिक लाभ आदी योजना संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमातून जनतेपर्यंत पोहचवीणे, हा उद्देश असल्याने या कार्यक्रमात सर्वच समाज घटकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री व भाजप लोकप्रतिनिधींनी केले आहे.
या संकल्प सिध्दी कार्यक्रम ग्रामीण विकास, शेती विकास, समृध्द शेतकरी संकल्पना साकारण्यास कृषि उत्पन्नात वाढ, ग्रामीण रोजगारात वृध्दी, विविध जोडधंदे, शेतीपुरक उद्योग, विविध विचार, संकल्पनांच्या माध्यमातून विकासाला गती देतांनाच केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ग्रामीण क्षेत्रातील सरपंच ग्रा. पं. सदस्य, पं. स. सदस्य, जि. प. सदस्य, शासन योजना कार्यान्वयन अधिकारी, कर्मचारी, विभाग प्रमुख,शेतकºयांचा सहभाग, कृषि तज्ज्ञ, पशु पालक, कुकूटपालक, शेळीमेंढी पालक, मत्स्य व्यवसायी, मधुमक्षीका पालक व या सर्व व्यवसायातील लोकांचा सहभाग राहिल.
या कार्यक्रमाद्वारे विविध विषयावरील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन होणार आहे.