हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:58+5:302021-07-03T04:18:58+5:30

यावेळी सिंदेवाहीचे तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. मानकर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सार्वत्रिक ...

Launch of universal medicine campaign for elephantiasis eradication | हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ

हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ

Next

यावेळी सिंदेवाहीचे तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. मानकर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत. नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता आरोग्य विभागामार्फत वाटप करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे, असे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

हत्तीरोगाच्या प्रतिबंधाकरिता यावर्षी देखील हत्तीरोगविरोधी तीन प्रकारची औषधे नागरिकांना देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये गरोदर माता, दोन वर्षांखालील बालके, अतिगंभीर रुग्ण वगळता सर्वांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष देखरेखीत औषध खाऊ घालण्यात येणार आहे.

त्यासोबतच, राज्यस्तरीय हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पाडला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम शिंदे, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Launch of universal medicine campaign for elephantiasis eradication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.