एलसीबीने वरोरा शहरातील हाॅटेलात पकडला १० लाखांचा जुगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:33 AM2021-09-14T04:33:16+5:302021-09-14T04:33:16+5:30
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना पथक तयार करण्याच्या सूचना केला. रविवारी रात्री वरोरा शहरात हे पथक गस्तीवर असताना एकर्जूना गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जीबी हॉटेलात जुगार चालू असल्याची माहिती मिळाली. या पथकाने धाड घातली. यामध्ये ११ जण ५२ ताश पत्त्यावर जुगार खेळत असताना आढळून आले. ३२ हजार ८५० रुपये रोख, १० मोबाईल संच किमत ८१ हजार ५०० रुपये व आठ वाहने किमत ९ लाख १० हजार रुपये, असा मुद्देमाल हस्तगत केला. जुगार खेळणाऱ्या ११ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, पोलीस हवालदार धनराज करकाडे, पोलीस शिपाई प्रशांत नागोसे, रवींद पंधरे यांनी सापळा रचून केली.
वरोरा पोलीस करतात काय?
वरोरा शहरात ९ सप्टेंबरला आनंदवन चौकातील एका हाॅटेलात जुगार सुरू होता. या जुगारात जिंकलेली रक्कम हिसकावून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटनाही वरोरा पोलिसांनी माहिती नव्हती. या घटनेच्या दोन दिवसांत चंद्रपूरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जाऊन जुगारावर कारवाई करते. मग वरोरा पोलिसांना याची माहिती नसते. वरोरात पोलिसांचे नेमके चालले काय, असा प्रश्न जनतेला पडला आहे.