ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:09 AM2018-08-19T00:09:02+5:302018-08-19T00:09:59+5:30

पूर्वी ज्याच्याकडे ताकद होती, तो जगावर राज्य करायचा. त्यानंतर ज्याच्याकडे पैसा होता. तो जगावर राज्य करायचा. मात्र आता ज्याच्याकडे ज्ञान आहे. तोच जगावर राज्य करू शकतो. मुलींनो, ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा. चंद्र्रपूरचे नाव जगभर पोहोचवा, .....

Lead the world through knowledge | ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा

ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आदिवासी मुलींच्या अद्ययावत वसतिगृहाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पूर्वी ज्याच्याकडे ताकद होती, तो जगावर राज्य करायचा. त्यानंतर ज्याच्याकडे पैसा होता. तो जगावर राज्य करायचा. मात्र आता ज्याच्याकडे ज्ञान आहे. तोच जगावर राज्य करू शकतो. मुलींनो, ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा. चंद्र्रपूरचे नाव जगभर पोहोचवा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींना वसतिगृहाची इमारत लोकार्पित करताना केले. चंद्रपूरमध्ये ३६० क्षमतेच्या अद्यावत वसतिगृहामध्ये या आठवड्यात मुली निवासीकरिता जाणार आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक एक व दोनचे लोकार्पण विद्यार्थिनींच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले. लोकार्पण सोहळ्याला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे आदी उपस्थित होते.
जगावर सद्या राज्य ज्ञानाचे आहे. ज्ञान मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. भारतामध्ये विशेषत: महाराष्ट्रात मुलींनी गुणवत्ता क्षेत्रात भरारी मारली आहे. महाराष्ट्रामध्ये मुलींच्या गुणवत्तेतील भरारीने मुलांपेक्षा जास्त मुलींच्या वसतिगृहांची आवश्यकता झाली आहे. कोणत्याही क्षेत्रात मुलींचे अस्तित्व ठळकपणे उमटत आहेत. त्यामुळे ३६० विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची निर्मिती पूर्ण झाल्याचा आनंद मोठा असल्याचे ना.सुधीर मुनगंटीवार त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे केवळ स्वत:साठी न वापरता हा देश, हा समाज जगाचे नेतृत्व करणारा झाला पाहिजे. आदिवासी मुली कुठेही कमी नाहीत. हजारो वर्षांपूर्वी एकलव्यानेही बाब सिद्ध केली होती. ही एकलव्याची भूमी आहे. त्यामुळे चंद्रपूरची गुणवत्ता जागतिक पातळीवर उमटेल, अशा पद्धतीने अभ्यास करा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आमदार शामकुळे यांनीही विचार मांडले. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे आदिवासी समूहाला मुख्य प्रवाहात आणण्याचे विविध क्षेत्रात कार्य गेल्या काही वर्षात घडत आहे. त्याचे दृश्य परिणाम दिसून येत असल्याचेही आ. श्यामकुळे यांनी नमूद केले. प्रास्ताविक करताना सुषमा साखरवाडे यांनी केले.
७२ तासांत पुरविली विद्यार्थिनींना पुस्तके
नव्या इमारतीमध्ये अद्यावत अभ्यासिकेची सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्मिती केली आहे. याठिकाणी फर्निचर व आवश्यक सुविधादेखील निर्माण केल्या आहेत. मात्र पुस्तके नाहीत. पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांत पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके देण्याची परंपरा सुरू केली आहे. यामुळे ना. मुनगंटीवार यांच्याकडे जमा झालेली चांगली पुस्तके विद्यार्थिनींना वाचायला मिळावी, अशी अपेक्षा सहायक अभियंता मनोज जुनोनकर यांनी व्यक्त केली. दरम्यान पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात मुलींना अभ्यासाची आणि सामान्य ज्ञानाची पुस्तके देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ७२ तासातच नव्या वसतिगृहात मुली जाण्यापूर्वीच सध्या राहत असलेल्या वसतिगृहावर स्वत: जवळची पुस्तके पोहचती केली. त्यामुळे विद्यार्थिनींना चेहऱ्यावर हास्य फु लले.

Web Title: Lead the world through knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.