मुनगंटीवारांसारखा नेता पंजाबला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 10:36 PM2018-12-05T22:36:10+5:302018-12-05T22:36:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चार वर्षात विकासकामांचा जो झंझावात ...

The leader of the Mungantiwar like Punjab | मुनगंटीवारांसारखा नेता पंजाबला हवा

मुनगंटीवारांसारखा नेता पंजाबला हवा

Next
ठळक मुद्देसोनू सूद : बल्लारपूर येथे होममिनिस्टर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चार वर्षात विकासकामांचा जो झंझावात दाखविला, त्याची माहिती मिळताच सोनू सूदसारखा कलावंतही भारावून गेला. ना. मुनगंटीवारांच्या कामातील सुसूत्रता आणि नियोजनबद्धता बघून सुधीर मुनगंटीवारांसारखा नेता पंजाब राज्यालाही हवा आहे, अशी प्रांजळ कबुलीच प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी दिली.
राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांमार्फ त दुर्गापूर येथील पालकमंत्री फुटबॉल चषक स्पर्धेत पाहुणे म्हणून सोनू सूद मंगळवारी येथे आले होते. यावेळी सोनू सूद यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
ना. मुनगंटीवार यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास कामांना बघून मी अतिशय प्रभावित झालो आहे. असा एखादा नेता माझ्या पंजाब प्रांतामध्येही हवा आहे, असेही अभिनेता सोनू सूद म्हणाले.
बल्लारपूर नगर परिषदेतर्फे आयोजित होममिनिस्टर या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आयोजित कार्यक्रमालाही सिनेअभिनेते सोनु सूद उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूर नगरपरिषदेचे अध्यक्ष हरिश शर्मा, मुख्याधिकारी बिपीन मुग्धा, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे व नगरपरिषेदेचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभिनेता सोनू सूद यांनी उपस्थित जनसमुदायाला स्वत:च्या शारीरिक क्षमतेवर अधिक भर देणे गरजे असल्याचे स्पष्ट केले. स्वत:चे आरोग्य उत्तम राहील, यासाठी व्यायाम ही सवय बनवा, असे आवाहनही केले. आपल्या चित्रपटाचे काही संवाद त्यांनी यावेळी सादर करून उपस्थितांकडून दाद मिळविली.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहरामध्ये गेल्या काही वर्षात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा यावेळी सादर केला. कार्यक्रमाचे संचालन शब्बीर अली व जांभूळकर यांनी केले.
सोनू सूद यांनी डोळ्यात साठविला चंद्रपूर व बल्लारपूरचा विकास
राज्याचे अर्थ, नियोजन व वन सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत:ला विकासकामात झोकून दिले. प्रत्येक काम देशपातळीवर पहिल्या क्रमांकाचे झाले पाहिजे, असा त्यांचा नेहमी अट्टाहास राहतो. अभिनेता सोनू सूद यांनी या दौऱ्यादरम्यान ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली विकासकामे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितली. अनेक कामांविषयी त्यांनी वृत्तपत्रातून माहिती जाणून घेतली. याबाबत सोनू सुद म्हणाले, मी मूळचा पंजाब राज्याचा रहिवासी आहे. मात्र पंजाबमध्येदेखील अशा पद्धतीचा विकास कामाचा झंझावात मला बघायला मिळाला नाही. यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा विकासासाठी स्वत:ला झोकून देणारा नेता हवा आहे, असे कार्यक्रमप्रसंगी अभिनेता सोनू सूद यांच्या तोंडून सहज निघाले.

Web Title: The leader of the Mungantiwar like Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.